स्वत:च्या रक्ताने बनवला “The Kashmir File”चे पोस्टर | पोस्ट शेअर करत विवेक अग्निहोत्री म्हणाले….
सध्या सोशल मीडियावर "द काश्मीर फाईल्स" चर्चेत आहे. अनेक नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर (social media) चित्रपटासाठी अनेक पोस्ट (Post) शेअर केल्या आहेत. कोणी या चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहेत तर कोणी विरोध. या चित्रपटातील घटनांविषयी त्याना माहीत असलेल्या गोष्टी इतरांसोबत शेअर करत आहेत. या सगळ्यामध्ये एका चाहतीने चक्क तिच्या रक्ताने पोस्टर बनवले आहे. त्याचा फोटो विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या ट्विटर (Twitter) अकाऊंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. रक्ताने (blood) काढलेलं पोस्टर शेअर करत विवेक म्हणाले, "OMG! अविश्वसनीय. मला काय बोलावे ते कळत नाही आहे मंजू सोनीजी यांचे आभार कसे मानावे. तुमचे खूप खूप आभार. जर कोणी त्यांना ओळखत असेल तर कृपया त्यांचा नंबर मला DM मध्ये शेअर करा. असे ट्वीट विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे.
यानंतर विवेक अग्निहोत्रीने आणखी एक ट्वीट पोस्ट केली हे ट्वीट करत म्हणाले: मी भावनांची कदर करतो पण लोकांनी असे काही करु नये अशी मी गंभीरपणे विनंती करतो. ही चांगली गोष्ट नाही. मध्य प्रदेशातील विदिशा येथे राहणारी आर्टिस्ट Artist मंजू सोनी (Manju Soni) यांनी हा चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या रक्ताने हे पोस्टर बनवले आहे. द काश्मीर फाईल्स च्या पोस्टरमध्ये दिसणाऱ्या प्रत्येक कलाकारांच्या चेहऱ्याचे चित्र आपल्या रक्ताने काढले आहे.
द काश्मीर फाईल्स हा काश्मिरी पंडितावर झालेल्या अत्याचारावर आधारित चित्रपट आहे. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवत आहे आणि हा चित्रपट अनेक राज्यांमध्ये करमुक्तही करण्यात आला आहे.