एकता कपूर, शोभा कपूरला पोलिसांकडून नोटीस, ‘अल्ट बालाजी’वरील वेबसिरीज ठरलं कारण...

एकता कपूर, शोभा कपूरला पोलिसांकडून नोटीस, ‘अल्ट बालाजी’वरील वेबसिरीज ठरलं कारण...

‘अल्ट बालाजी’वरील अश्लील दृश्यांप्रकरणी बोरिवली येथील एमएचबी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याप्रकरणी एकता कपूर, शोभा कपूर आणि ‘अल्ट बालाजी’ला पोलिसांनी नोटीस पाठवली आहे.
Published by :
shweta walge
Published on

‘अल्ट बालाजी’वरील अश्लील दृश्यांप्रकरणी बोरिवली येथील एमएचबी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याप्रकरणी एकता कपूर, शोभा कपूर आणि ‘अल्ट बालाजी’ला पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. याप्रकरणी आवश्यक कागदपत्रे घेऊन येण्याची सूचना करण्यात आली आहे. वेबसीरिजमधील अश्लील दृश्यामध्ये अल्पवयीन मुलीचा वापर करण्यात आल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

एमएचबी पोलिसांनी शुक्रवारी ‘अल्ट बालाजी टेलिफिल्म’, एकता कपूर आणि शोभा कपूर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. आवश्यक कागदपत्रे घेऊन २४ ऑक्टोबरपर्यंत येण्याची सूचना करण्यात आली आहे.अल्ट बालाजी’वरील ‘क्लास ऑफ २०१७’ आणि ‘क्लास ऑफ २०२०’ या वेबसीरिजबाबत तक्रार करण्यात आली आहे. यावेळी अश्लील चित्रीकरणादरम्यान अल्पवयीन मुलीचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com