planet मराठीच्या ‘या’ वेबसिरीजचा टीझर प्रदर्शित…
प्लॅनेट मराठी अॅप हे पहिलं मराठी ओटीटी प्लॅटफॉम म्हणुन लॅांच झाले. प्लॅनेट मराठीवर आता नवनवीन कंटेंट येत आहेत.#फ्रेंडशिप डे च्या मुहूर्तावर "हिंग पुस्तक तलवार" या वेबसिरीजचा टीझर प्रदर्शित झाला आहे. ही वेबसिरीज ४ खट्याळ मित्रांच्या आयुष्यावर आहे.
'हिंग पुस्तक तलवार' या वेबसिरीजचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी याने केल असुन याची निर्मिती sixteen by sixty four media या प्रोडक्शन हाऊसने केली आहे. या वेबसिरीजमध्ये अलोक राजवाडे,सौरभ घाडगे, नील सालेकर, क्षितिज दाते,मानसी भावलकर,शौनक चांदोरकर ,केतकी कुलकर्णी हे कलाकार झळकणार आहेत.
निपुण धर्माधिकारी त्याच्या सिनेमां आणि नाटकांमधून सतत वेगवेगळे विषय हाताळत असतो. या वेबसिरीजचे नाव पात्रांच्या स्वभावानुसार ठेवले असल्याचे कळते, म्हणजेच कोणी हिंगासारखे तिखट विचारांचा तर कोणी पुस्तकासारखा अभ्यासू तर कोणी तलवारीसारखा धारधार असा आहे. फ्रेंडशिप डे च्या मुहूर्तावर याच्या टीझर प्रदर्शित केला असून हि वेबसिरीज ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होणार आहे.