Pankaj Tripathi
Pankaj TripathiTeam lokshahi

Pankaj Tripathi : मी अभिनेता झालो नसतो तर शेतकरीच असतो

पंकज त्रिपाठींनी उघड केला आपल्या करिअरबद्दलचा किस्सा....
Published by :
Published on

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) आज चित्रपटसृष्टीत ज्या स्थानी आहेत तिथं पोहोचायला त्यांना जवळपास दोन दशके लागली होती. पंकज त्रिपाठी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, जर ते शोबिझच्या जगात नसते तर शेतकरी झाले असते किंवा राजकारणात करिअर केला असता.

Pankaj Tripathi
Jacqueline Fernandez : जॅकलिनचा एथनिक लूक पाहिलात का?

पंकज सध्या आपल्या आगामी 'शेरडील: द पिलीभीत सागा' या खऱ्या घटनांनी प्रेरित असलेला चित्रपट प्रदर्शित करण्याच्या तयारीत आहे. पंकज त्रिपाठी म्हणाले जर मी अभिनेता झालो नसतो तर मी शेतकरी झालो असतो. माझे वडील शेतकरी होते आणि हे माझे वडिलोपार्जित काम आहे. मी शेती केली असती किंवा कदाचित मी राजकारणात आलो असतो. 45 वर्षीय स्टार पंकज त्रिपाठीने 2004 मध्ये 'रन' आणि 'ओंकारा'मध्ये छोट्या भूमिकेतून सुरुवात केली.

Pankaj Tripathi
Sara Tendulkar : सारा तेंडुलकरचे स्पेशल फोटोशूट पाहिलंत का?

परंतु 2012 मध्ये 'गँग्स ऑफ वासेपूर'मधून त्याला यश मिळाले. पंकज पुढे म्हणाला की माझ्या अभिनय कारकिर्दीची मोठी कहाणी आहे. मला यामध्ये रस होता आणि त्यासाठी मी शेती आणि विद्यार्थी राजकारण सोडून सिनेमाकडे आलो. मी यशस्वी झालो की नाही हे मला माहीत नाही. पण तरीही मी नाही ते करू शकलो. पोहोचण्यासाठी 15-20 वर्षे लागली.

पंकज त्रिपाठी यांनी 'फुक्रे', 'मसान', 'निल बट्टे सन्नाटा', 'बरेली की बर्फी', 'न्यूटन', 'स्त्री', 'लुडो' आणि 'मिमी' यांसारख्या चित्रपटांमध्ये उत्तम काम केले. याशिवाय पंकजने 'मिर्झापूर', 'क्रिमिनल जस्टिस', 'युवर ट्रूली' आणि 'क्रिमिनल जस्टिस: बिहाइंड क्लोस्ड डोअर्स' या वेब सीरिजमध्येही काम केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com