ज्येष्ठ तबलावादक भरत कामत व हार्मोनियम वादक सुधीर नायक यांना पं. भीमसेन जोशी स्मृती पुरस्कार 2022 जाहीर!

ज्येष्ठ तबलावादक भरत कामत व हार्मोनियम वादक सुधीर नायक यांना पं. भीमसेन जोशी स्मृती पुरस्कार 2022 जाहीर!

Published by :
Pankaj Prabhakar Rane
Published on

जीएसबी सभा मुलुंड या संस्थेतर्फे मुंबई फोरम ऑफ आर्टिस्टच्या सहकार्यानं 27 मार्चला पं. भीमसेन  जोशी  स्मृती समारोह आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात ज्येष्ठ तबलावादक श्री. भरत कामत आणि हार्मोनियम वादक श्री. सुधीर नायक यांना यंदाचा पं. भीमसेन जोशी स्मृती पुरस्कार 2022  प्रदान करण्यात येणार असून, त्यांच्यासह संगीत क्षेत्रातील मान्यवर कलाकारांचे या महोत्सवात सादरीकरण होणार आहे.

जीएसबी सभा, मुलुंड या संस्थेतर्फे मुंबई फोरम ऑफ आर्टिस्ट यांच्या सहकार्याने दरवर्षी हा महोत्सव आयोजित करण्यात येतो. येत्या रविवारी 27 मार्चला सायंकाळी 5.30 वाजता मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघाच्या सभागृहात हा कार्यक्रम रंगणार आहे.

या कार्यक्रमात ज्येष्ठ तबलावादक श्री. भरत कामत आणि हार्मोनियम वादक श्री. सुधीर नायक यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. तसेच ज्येष्ठ गायक पं. राम देशपांडे यांची संगीत मैफल होणार आहे. त्यांना सुधीर नायक हार्मोनियम साथ, भरत कामत तबला साथ, माधव पवार पखवाज साथ, रवींद्र शेणॉय मंजिरा साथ करणार आहेत. ज्येष्ठ सूत्रसंचालक सुधीर गाडगीळ या कार्यक्रमाचं निवेदन करणार आहेत.

हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून याच्या प्रवेशिका महाराष्ट्र सेवा संघ हॉल, मुलुंड येथे सकाळी 10.30 ते संध्या.7 पर्यंत उपलब्ध आहेत तरी जास्तीतजास्त रसिक श्रोत्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आव्हान आयोजकांनी केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com