fulora
fuloraTeam Lokshahi

‘पंचायत’ चा दुसरा सीजनला प्रेक्षकांची पसंती

आठ एपिसोडच्या माध्यमातून मांडले फुलेरा गावातील कथानक
Published by :
Saurabh Gondhali
Published on

पहिल्या सीझनमध्ये फुलेरा (fulora)गावात अभिषेक त्रिपाठीचा (Abhishek Tripathi) झालेला प्रवेश. सरकारी नोकरी सांभाळताना त्याची झालेली फजिती, गावकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना झालेला त्रागा हे सारं प्रेक्षकांना कमालीचं भावलं होतं. गावाचे सरपंच, गावचं राजकारण (Politics)यासाऱ्याचा इच्छा नसतानाही अभिषेकला एक भाग व्हावं लागतं. सुरुवातीला यासगळ्याचा उबग येवून पुन्हा शहरात जावं असं वाटूनही गेलं. मात्र आपण समजतो तसं गाव नाही, माणसंही तशी नाही. ती प्रेमळ आहेत. संवादाचा पूल बांधल्यावर जे काही घडून येतं ते मात्र अभिषेकला खूप काही शिकवून जाणारं होतं. यासगळ्यात पहिल्या सीझनचा पसारा आटोपल्यावर दुसऱ्या सीझनकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. त्यात दिग्दर्शक दीपक कुमार मिश्रा (Deepak Mishra)काय सादर करणार याची उत्सुकताही प्रेक्षकांना होती.

fulora
सिद्धूला शिक्षा झाली ते 34 वर्षांपुर्वीचं प्रकरण समजून घ्या 8 मुद्यांमधून...

दुसऱ्या सीझनमध्ये आठ एपिसोडच्या माध्यमातून फुलेरा गावातील कथानक आपल्यासमोर उलगडत जातं. आणि आपण त्यात गुंतत जातो. फुलेरा गावात सरपंच मंजु देवी, ब्रज भुषण दुबे, प्रल्हाद पांडे, कार्यालय सहायक विजय आणि पंचायत सचिव अभिषेक त्रिपाठी यांचे वेगवेगळे किस्से पुन्हा एकदा आपल्याला खळखळून हसवतात आणि मनोरंजन करतात. पंचायत 2 पाहताना आपण कुठेही निराश होत नाही की आपल्याला रटाळपणाही जाणवत नाही. ही खरी तर दिग्दर्शकाची कमाल म्हटली पाहिजे. त्यानं सध्या क्राईम, अॅक्शन थ्रिलरच्या आहारी गेलेल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा वेगळ्या धाटणीच्या पंचायतकडे खेचून आणले आहे.

fulora
मंदिर-मशिदचे तीन वाद : एकाच दिवसांत तीन कोर्टाचे निकाल

पंचायतचा शेवटचा भाग भलेही थोड्या लांबीचा वाटत असला तरी तो नेहमीप्रमाणे संपुच नये असा वाटणारा आहे. मंजु देवीला आता वेगवेगळ्या गोष्टींशी डिल करावे लागत आहे. त्याचा त्रास पंचायत सचिव अभिषेकला होतो आहे. तो मुकाटपणे अनेक गोष्टी सहन करतो आहे. त्यातून आपल्याला नव्यानं काही शिकायला मिळते असा त्याचा दृष्टिकोन मात्र दिग्दर्शक प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर मांडतो. तोच आपल्याला शेवटपर्यत खिळवून ठेवतो. त्याचमुळे पंचायत प्रवास रंजक वाटू लागतो. त्याचे श्रेय कलाकार आणि दिग्दर्शकाला द्यावेच लागेल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com