आता येणार भारतीय महिला क्रिकेट संघांची कर्णधार मिताली राजवर बायोपिक!
सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकच्या ट्रेंडची चलती आहे. यामध्ये एम एस धोनी, सचिन तेंडुलकर, मिल्खा सिंह, मेरी कोम या भारतीय खेळाडूंच्या जीवनावर बायोपिक रिलीज झाले आहेत. यामध्ये आता भारतीय महिला वन डे आणि टेस्ट क्रिकेट संघांची कर्णधार मिताली राजचा बायोपिक २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
मिताली राजच्या बायोपिक 'शाब्बास मिथू' चा फर्स्ट लुक नुकताच रिलीज झाला आहे. या सोबतच या सिनेमाची रिलीज डेटची सुद्धा घोषणा करण्यात आली आहे. या सिनेमात बॉलिवूडटची स्टार अभिनेत्री तापसी पन्नू मितालीची व्यक्तिरेखा साकारत आहे. हा सिनेमा ५ फेब्रुवारी २०२१ मध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन राहुल ढोलकिया करत आहे.
मिताली राजनं ३२ टी-२० सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. यात २०१२, २०१४ आणि २०१६ तीन वर्ल्ड कपमध्ये कर्णधारी केली. २००६ मध्ये महिला संघानं पहिला टी-२० सामना खेळला तेव्हा मिताली कर्णधार होती. मितालीनं ८९ टी-२० सामने खेळले आहे.
यात तिनं २३६४ धावा केल्या आहेत, यात १७ अर्धशतकांचा समावेश आहे. ९७ हा मितालीचा टी-२० क्रिकेटमधली सर्वोत्ताम खेळी ठरली आहे. मितालीनं ३ सप्टेंबर २०१९ मध्ये टी २० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
या सिनेमात मराठमोळी अभिनेत्री तितीक्षा तावडेही झळकणार आहे. तितीक्षाने काही फोटो शेअर केले आहे. तितिक्षा तावडेने कलर्स मराठी वरील सरस्वती तसेच झी मराठी वाहिनीवरील कन्यादान या मालिकांमध्ये काम केले आहे. तितिक्षा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिचे विविध फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.