Health
HealthLokshahi Team

वेळेवर झोप लागत नाही ? जाणून घ्या उपाय

विचारांना वेळीच नियंत्रणात आणायला हवं.
Published by :
Published on

आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ताण तणाव (tension) या गोष्टीमुळे आपल्या मनात नेहमी निराशा दाटलेली असते. दिवसभरात‌ घडलेल्या काही गोष्टी किंवा अनुभव , विचार हे सतत मनामध्ये रेंगाळत असतात. अशावेळी मनामध्ये नेहमी चिंता दाटलेली असते. असंख्य विचार आपल्या मनामध्ये गुरफटत असतात. या विचारांना वेळीच नियंत्रणात आणायला हवं. कारण आपल्या आरोग्याला जास्त विचार करणं हे हानिकारक आहे असं म्हटलं जातं. यामुळे रात्री झोपताना वेळेवर झोप (sleeping )न लागण्याची कारणे समोर येतात.

Health
तुम्ही किती तास झोपता? जाणून घ्या वयानुसार किती तासांची झोप आवश्यक

कारण अचूक वेळेचे नियोजन केल्याशिवाय आपल्या आरोग्यावर आपल्याला नियंत्रण ठेवणे अशक्य. पुरेसा आहार आणि पुरेसे पाणी पिणे हे आरोग्याच्या दृष्टीने सर्वात मोठे सूत्र आहे. यामुळे दैनंदिन जीवनात आपले आरोग्य नियंत्रणात राहू शकते.

८०% टक्के लोक कामातून मोकळी असल्यास जास्तीत जास्त झोपेला प्राधान्य देतात. कारण पुरेशी झोप असल्यास मानसिक ताण तणाव दूर होतो आणि आपल्या आरोग्यास याचा लाभ मिळतो.

वेळेवर झोप लागत नसेल तर दुधामध्ये मधाचे मिश्रण करून दररोज एक कपभर दूध प्यावे. दररोज असं केल्याने नक्कीच फरक आढळून येईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com