”पुढची दोन वर्ष तरी चांगले नाटक येणार नाही”

”पुढची दोन वर्ष तरी चांगले नाटक येणार नाही”

Published by :
Published on

अमोल धर्माधिकारी | राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आता सर्वच निर्बंध शिथिल करण्यात आली आहेत. मात्र नाट्यगृह अद्यापही बंदच आहे. सर्वच शिथिल केल्यानंतर नाट्यगृह सुरू करायला हरकत नाही, असे मत नोंदवत अभिनेता प्रशांत दामले यांनी पुढची दोन वर्ष तरी चांगले नाटक येईल की नाही अशी शंका असल्याचे विधान केले.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांची बालगंधर्व रंगमंदिर पुनर्निर्माण प्रकल्पाबाबत चर्चा करण्यासाठी भेट घेतली त्या वेळी ते बोलत होते. राज्यात सगळं सुरु झालं आहे, सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी आहे मात्र नाट्यगृहे का बंद आहेत असा सवाल प्रसिद्ध कलाकार प्रशात दामले यांनी विचारला आहे.

दुसरीकडे कोरोना,लॉकडाऊनमुळे नाटक मरणार नसलं तरी नवीन पिढी तयार होणार नाही, कलावंत आणि लेखकाच्या बाबतीत असेच होणार आहे. चांगले लेखक जर चित्रपट, अोटीटी, सीरीयल्सकडे गेले तर, वाटत नाही मला अशी खात्री आहे, पुढची दोन वर्ष तरी चांगले नाटक येईल की नाही अशा शंका उपस्थित होत आहे. इतकी भीषण परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी खंत ही प्रशांत दामले यांनी व्यक्त केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com