Nitin Desai : नितीन देसाईंच्या मृतदेहाचे शवविच्छेदन, मृत्यूचे कारण आले समोर

Nitin Desai : नितीन देसाईंच्या मृतदेहाचे शवविच्छेदन, मृत्यूचे कारण आले समोर

सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली
Published on

सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी आयुष्य संपवलं. नितिन देसाई हे लोकप्रिय कलादिग्दर्शक असण्यासोबत निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेतेदेखील होते.

नितीन चंद्रकांत देसाई यांचे पोस्टमॉर्टम बुधवारी जेजे रुग्णालयात करण्यात आले. नितीन देसाई यांचा मृतदेह खालापूर पोलिसांनी शवविच्छेदनासाठी जेजे रुग्णालयात आणला होता. यावर रायगड पोलिसांनी माहिती दिली आहे की, चार डॉक्टरांच्या पथकाने कलादिग्दर्शक नितीन देसाई यांचे शवविच्छेदन केले. प्राथमिक निष्कर्षानुसार मृत्यूचे कारण फाशीमुळे झाले आहे. पुढील तपास सुरू आहे.

नितीन देसाई यांनी गळफास लावून आत्महत्या केली. एनडी स्टुडिओमधील काही कर्मचाऱ्यांना गळफास लावलेल्या अवस्थेत नितीन देसाई दिसून आले. कर्मचाऱ्यांनी लगेच पोलिसांना याबद्दल कळवले. स्टुडिओ सुरक्षा रक्षकाने पोलिसांनी माहिती दिली की, नितिन देसाई अनेकदा स्टुडिओत यायचे आणि रात्री उशीरा किंवा सकाळी जायचे ते आज बाहेर आले नाही म्हणुन सुरक्षा रक्षक पहायला गेला असता त्यांनी गळफास घेतल्याचे दिसले. सकाळी सुरक्षा रक्षकाने पोलिसांना फोन करुन माहिती दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com