नितीन देसाईंची अखेरची इच्छा 'अशी' झाली पूर्ण
निस्सार शेख | चिपळूण : लालबागचा राजा मोठ्या थाटामाटात विराजमान झाला आहे. पहिल्याच दिवसापासून लालबागच्या राजाची दर्शन घेण्यासाठी भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. यंदा लालबागच्या राजा शिवराज्यभिषेक सोहळ्याचा मंडप उभारला आहे. मंडपाची ही प्रतिकृती कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी साकारली आहे. ही त्यांची शेवटची कलाकृती ठरली आहे. दरम्यान, लालबागचा राजाचे मंडळ यांनी कृतज्ञतेच्या भावना या देसाई कुटुंबासाठी व्यक्त केली. हा सगळा भावनिक प्रसंग श्रीकांत देसाई यांनी कथन केला.
मुंबईतील लालबागच्या राजाला यावर्षी शिवराज्याभिषेक दिन सोहळा दाखवायचा होता. त्यासाठी नितीन देसाई यांनी हा सेट उभारण्याची तयारी सुरू केली होती. या सेटच्या उभारण्यासाठी त्यांनी श्रीफळ वाढवले होते. हा सगळा सोहळा भव्य करण्याची त्यांची इच्छा होती व तशी तयारी त्यांनी केली होती. पण, नितीन देसाई यांनी सगळ्यांचा दुर्देवीरित्या अखेरचा निरोप घेतला. त्यांची ही इच्छा देसाई यांचे कुटुंब त्यांच्यासोबत काम करणारे अन्य नेहमीचे मदत करणारे स्टुडिओमधील कलाकार व लालबागचा राजा मंडळाच्या मदतीने पूर्ण केली आहे.
लालबागच्या राजाच्या गणपतीला लालबागचा राजा विराजमान झाला. त्यावेळी ही इच्छा पूर्ण करून हा सगळा राज्याभिषेक सोहळा सेट उभा करण्याचा प्रयत्न केला. यावेळी लालबागचा राजाचे मंडळ यांनी कृतज्ञतेच्या भावना या देसाई कुटुंबासाठी व्यक्त करत ज्येष्ठ कलादिदर्शक मराठी कलाकार नितीन देसाई यांच्या आठवणींना उजाळा दिला. हा सगळा भावनिक प्रसंग श्रीकांत देसाई यांनी कथन केला.
दरम्यान, कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्येला केल्याने सिनेसृष्टीला धक्का बसला होता. याप्रकरणी त्यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी एडलवाईज या फायनान्स कंपनीच्या पाच बड्या अधिकाऱ्यांविरोधात खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र, याप्रकरणात अद्यापपर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.