अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्यावर कमेंट्सचा पाऊस… ‘ये नयन डरे डरे’!

अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्यावर कमेंट्सचा पाऊस… ‘ये नयन डरे डरे’!

Published by :
Published on

लोकशाही न्यूज नेटवर्क

व्हॅलेंटाइन्स डे च्या निमित्ताने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं एक रोमॅन्टिक गीत प्रसारित झालंय. याचा व्हिडिओ त्यांनी सोशल मिडियावर पोस्ट केला आहे. यानंतर फडणवीस यांच्या 'बहुचर्चित' गाण्याचा 'फिव्हर' सगळीकडे पाहायला मिळतोय. नेटकऱ्यांनी या गाण्यावर केलेल्या कमेंट्स देखील भन्नाट आहेत. यातील बहुतांश जणांनी गायिकेची खिल्ली उडवली आहे.

'रात हसीं ये चाँद हसीं… तू सबसे हसीं मेरे दिलबर… और तुझसे हसीं तेरा प्यार… तू जाने ना, ये नयन डरे डरे… ये जाम भरे भरे… जरा पीने दो…' असे या गाण्याचे बोल आहेत. व्हॅलेंटाइन्स डेच्या निमित्तानं अमृता यांनी खास त्यांच्या चाहत्यांसाठी हा व्हिडिओ शेअर केला आहे. या रोमॅन्टिक गाण्याचा अनुभव छान होता,' असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com