Netflix Squid Game 2: "स्क्विड गेम 2" चा ट्रेलर रिलीज; 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Netflix Squid Game 2: "स्क्विड गेम 2" चा ट्रेलर रिलीज; 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

ह्वांग डोंग-ह्युक लिखित आणि दिग्दर्शित "स्क्विड गेम 2" ही एक कोरियन वेब सीरिज आहे. या वेब सीरिजचा पाहिला भाग सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होता.
Published by :
Team Lokshahi
Published on

ह्वांग डोंग-ह्युक लिखित आणि दिग्दर्शित "स्क्विड गेम 2" ही एक कोरियन वेब सीरिज आहे. या वेब सीरिजचा पाहिला भाग सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होता. स्क्विड गेमचा पहिला भाग फार चर्चेत देखील येताना दिसला त्या सीरिजला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसला. त्यामुळे स्क्विड गेमचा दुसरा भाग लवकरात लवकर काढावा अशी प्रक्षक मागणी करत होते आणि प्रेक्षकांच्या मागणीवरून स्क्विड गेमचा दुसरा भाग येणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर यावेळेस "स्क्विड गेम 2" चा ट्रेलर रिलीज झाला आहे आणि ही वेब सीरिज 26 डिसेंबर रोजी रिलीज होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

तर आता या सीरिजची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली पाहायला मिळत आहे. यादरम्यान नेटफ्लिक्सने "स्क्विड गेम 2" च्या ट्रेलरची पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहलं आहे, 'Game Will Not Stop' "खेळ संपला. पुन्हा खेळायचे? स्क्विड गेम सीझन 2 26 डिसेंबर रोजी येत आहे". स्क्विड गेम सीझन 2 मध्ये ली जंग-जे, ली ब्युंग-हुन, वाई हा-जून आणि गॉन्ग यू हे कलाकार दिसणार आहेत. तर यावेळेस नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. पोस्टमध्ये कमेंटद्वारे प्रेक्षकांकडून सकारात्मक आणि उत्सुकता व्यक्त करणारे प्रतिसाद पाहायला मिळत आहेत. यावेळेस काय स्टोरी असेल आणि हा भाग देखील पहिल्या भागाप्रमाणेच लोकप्रिय होईल का? असे अनेक प्रश्न निर्माण होतं आहेत. तर आता या "स्क्विड गेम 2" कोरियन वेब सीरिजच्या रिलीज डेटकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

पहिला सीजन कसा होता:

स्क्विड गेम या कोरियन वेब सीरिजचा पहिला भाग 2021 मध्ये प्रदर्शित झाली होती ज्यामध्ये एकूण 9 भाग होते. ही सीरिज एवढी प्रसिद्ध झाली होती की, नेटफ्लिक्सवरील 94 देशांपैकी टॉप 10 मध्ये स्क्विड गेम या सीरिजचे नाव होते आणि त्यामुळे 2021 मधील सर्वात लोकप्रिय सीरिजपैकी एक स्क्विड गेम ही वेब सीरिज ठरली होती. या वेब सीरिजची कथा अशी होती की, यात काही कर्जबाजारी लोकांचा समूह दाखवण्यात आला होता. त्यांना पैशांच आमीश दाखवून हा गेम खेळण्यासाठी आणलं गेलं होत. त्यांना एक टास्क दिला जात होता आणि त्या टास्कमध्ये जो व्यक्ती चुकेल किंवा हरेल त्याला शिक्षा म्हणून मृत्यू दिली जात होती. अशा प्रकारे, शेवटी एक विजेता राहिला आणि तो ही रक्कम जिंकून तिथून सुखरुप बाहेर आला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com