नेहा धुपिया पुन्हा एकदा आई झाली, पुत्ररत्नाचा लाभ

नेहा धुपिया पुन्हा एकदा आई झाली, पुत्ररत्नाचा लाभ

Published by :
Published on

बॉलिवूडची दमदार अभिनेत्री नेहा धुपिया पुन्हा एकदा आई झाली आहे. अभिनेत्रीने एका मुलाला जन्म दिला आहे. तिचा पती आणि अभिनेता अंगद बेदीने अभिनेत्रीच्या मुलाच्या जन्माविषयी बातमी चाहत्यांसोबत शेअर केले आहे. जुलै महिन्यात नेहा आणि अंगदने सोशल मीडियावर फोटो शेअर करून चाहत्यां नेहाच्या गर्भधारणेची माहिती दिली. या फोटोमध्ये पती अंगद बेदी आणि मुलगी मेहर नेहासोबत दिसली होती. आता नेहा पुन्हा आई झाल्याच्या बातमीने सर्वजण आनंदी आहेत.

नेहा आणि अंगद यांनी आपली मुलगी मेहेर हिच्यासोबत एक फोटो शूट केले होते व त्यातील फोटोतून त्यांनी त्यांच्याकडील गूड न्यूज चाहत्यांना दिली होती. नेहा आणि अंगदने मे २०१८ साली लग्न केले होते आणि त्यांच्यातील खास गोष्ट म्हणजे १८ नोव्हेंबरला त्यांनी त्यांच्या मुलीला जन्म दिला. नेहा लग्नाच्या आधीच प्रेग्नेंट होती. त्यामुळे ती खूपच चर्चेत होती. तिने जेव्हा ती पुन्हा एकदा आई बनण्याची बातमी दिली, तेव्हा तिच्या चाहत्यांना खूप आनंद झाला होता.

आज अंगद बेदीने नेहा धुपियासोबतचा एक फोटो शेअर करून चाहत्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्याने लिहिले आहे की ' आज सर्वात श्रेष्ठ शक्तीने आज आम्हाला मुलाचा आशीर्वाद दिला. नेहा आणि बाळ दोघेही ठीक आहेत. असे कॅप्शन देण्यात आले आहे. नेहा धुपिया सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. ती नेहमीच तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करते. अलीकडेच नेहा धुपियाने तिचे मॅटरनिटी फोटोशूट केले. या फोटोशूटमध्ये नेहा धुपियाची बोल्ड स्टाईल चाहत्यांकडून सर्वाधिक पसंत केली जात आहे. बऱ्याच दिवसांपासून नेहा हे फोटो तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत आहे. जे सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com