बॉलीवूड ड्रग्ज प्रकरण : रिया चक्रवर्ती विरुद्ध NCB दाखल करणार पहिले आरोपपत्र

बॉलीवूड ड्रग्ज प्रकरण : रिया चक्रवर्ती विरुद्ध NCB दाखल करणार पहिले आरोपपत्र

Published by :
Published on

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी नारकोटिक्स ब्युरो (NCB) या प्रकरणात पहिले आरोपपत्र दाखल करणार आहे. या प्रकरणात सुशांतला ड्रग्ज पुरवणारे बॉलिवूडमधील लोक आणि त्यांचे इतर कनेक्शन तपासले जात आहे. या आरोपपत्रात रिया चक्रवर्ती हिला मुख्य आरोपी बनवण्यात आले असून, अन्य 32 जणांनाही आरोपींच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे

सुशांत सिंह ड्रग्ज प्रकरणात एनसीबी आज न्यायालयासमोर ३० हजार पानांचं आरोपपत्र दाखल करणार आहे. एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे स्वतः आरोपपत्र सादर करणार आहेत. या आरोपपत्रात मुख्य आरोपी म्हणून रिया चक्रवर्ती हिच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. तर, इतर आरोपी म्हणून रियाचे निकटचे सहकारी आणि अनेक ड्रग पेडलर्स, ड्रग पुरवठा करणाऱ्यांची नावेही आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आली आहेत. ही चार्जशीट मोबाईल फोन आणि संगणक या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या फॉरेन्सिक तपासणीनंतर आणि साक्षीदारांच्या निवेदनांच्या आधारे तयार केली गेली आहेत. यात अभिनेत्री सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची नावेही समोर येण्याची शक्यता वर्वण्यात येत आहे.

नक्की काय आहे प्रकरण :
१४ जून २०२० रोजी सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह संशयास्पद आढळून आला होता. मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या घरात त्याने आत्महत्या केल्याचं पोलिसांनी म्हटलं होतं. त्याच्या मृत्यूवरून नंतर प्रचंड वादविवाद झाले. सुशांतने आत्महत्या केलेली नसून, त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोपही अनेकांनी केला होता.
सुशांतने आत्महत्या केली की, त्याची हत्या झाली? हा वाद सुरू असतानाच ड्रग्ज प्रकरण समोर आलं होतं. यात प्रकरणात एनसीबीने तपास सुरू केला होता. अनेक ठिकाणी धाडी टाकत एनसीबीने ड्रग्ज जप्त केलं होतं. तसेच रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीसह अनेकांना अटक करण्यात आली होती. रिया आणि शौविक यांच्यावर सुशांतला ड्रग्ज पुरवल्याचा आरोप आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com