गौतमी पाटील MMS प्रकरण : एका तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात

गौतमी पाटील MMS प्रकरण : एका तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात

काही दिवसांपूर्वी गौतमी पाटील कपडे बदलतानाचा तिचा व्हिडिओ काढून व्हायरल करण्याचा प्रकार समोर आला होता.
Published on

संतोष आवारे | अहमदनगर : राज्यभरात प्रसिद्धीच्या झोतात आलेली लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील कायम चर्चेत असते. गौतमी पाटीलचा मध्यंतरी चेंजिंग रूममधील कपडे बदलतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी पुणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे हा तरूण अल्पवयीन असल्याची माहिती समोर येत आहे.

गौतमी पाटील MMS प्रकरण : एका तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात
राष्ट्रवादीत नाराजीच्या चर्चां, जयंत पाटलांचा खुलासा; म्हणाले...

गौतमी पाटीलच्या व्हायरल व्हिडिओप्रकरणी पुणे पोलीस तपास सुरू असून अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरेखांड येथील एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. या मुलाने गौतमी पाटील या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाउंट उघडून तिचे फोटो व्हायरल केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे त्या मुलाने वापरलेले सिम कार्ड त्याच्या आईच्या नावावर आहे.

आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला नोटीस देऊन गुरुवारी विमाननगर पोलीस ठाण्यात आई-वडील आणि मुलगा यांना हजर होण्यास सांगितले आहे. तसेच, या तरुणासोबत आणखी एक व्यक्ती होती, अशी माहिती मिळत आहे. इंस्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल करण्याच्या उद्देशाने यांनी हा प्रताप केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

दरम्यान, गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा एक अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत राज्य महिला आयोगानेही याची दखल घेतली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com