कोणत्याही संवादाविना मिलिंद शिंदे 'सर्किट'मध्ये खलनायकच्या भूमिकेत

कोणत्याही संवादाविना मिलिंद शिंदे 'सर्किट'मध्ये खलनायकच्या भूमिकेत

"सर्किट" ७ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होणार
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

अभिनेते मिलिंद शिंदे यांनी विविध भूमिकांमधून आपल्या कसदार अभिनयाचं दर्शन घडवलं आहे. पण ७ एप्रिलला प्रदर्शित होणारा "सर्किट" हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीकला अनोखा चित्रपट ठरणार आहे. कारण या चित्रपटातील त्यांच्या खलनायकी भूमिकेसाठी त्यांच्या वाट्याला एकही संवाद नसून, केवळ शारीरिक हालचाली आणि चेहऱ्यावरील हावभावांच्या जोरावर त्यांनी या भूमिकेत अभिनयाचे रंग भरले आहेत.

भांडारकर एंटरटेन्मेंट आणि पराग मेहता प्रस्तुत "सर्किट" या चित्रपटाची निर्मिती मधुर भांडारकर, फिनिक्स प्रॉडक्शनच्या पराग मेहता, अमित डोगरा आणि देवी सातेरी प्रॉडक्शनच्या प्रभाकर परब यांनी केली आहे. स्वरूप स्टुडिओचे सचिन नारकर, विकास पवार तर फिनिक्स प्रॉडक्शनचे अल्पेश गेहलोत, कीर्ति पेंढारकर, आकाश त्रिवेदी, मनोज जैन, मोहित लालवाणी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. आकाश पेंढारकर यांनी या चित्रपटातून आपले दिग्दर्शकीय पदार्पण केलं आहे. आनंद पेंढारकर, जितेंद्र जोशी यांनी गीतलेखन, तर अभिजीत कवठाळकर यांचं श्रवणीय संगीत या चित्रपटाला लाभलं आहे. संजय जमखंडी यांनी रुपांतरित कथा आणि संवाद लेखन, शब्बीर नाईक यांनी छायांकन, तर अतुल साळवे यांनी कार्यकारी निर्माता म्हणून जबाबदारी निभावलीय. चित्रपटात वैभव तत्त्ववादी, हृता दुर्गुळे, रमेश परदेशी, मिलिंद शिंदे अशी तगडी स्टारकास्ट आहे.

खलनायकी भूमिकेच्या वाट्याला स्वाभाविकपणे खटकेबाज संवाद येतात, शिवाय अभिनयाचीही संधी असतेच. पण सर्किट या चित्रपटातील खलनायकी भूमिकेला एकही संवाद नाही. केवळ डोळे आणि चेहऱ्यावरील हावभावातून ही भूमिका साकारणं अत्यंत आव्हानात्मक होतं. पण मिलिंद शिंदे यांनी हे आव्हान पेलत खलनायकी भूमिकेचा नवा मानदंडच प्रस्थापित केला आहे. सर्किट चित्रपटाच्या टीजर आणि ट्रेलरमधून चित्रपटाविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे मिलिंद शिंदे यांचा एकाही संवादाविना साकारलेला खलनायक ७ एप्रिलला चित्रपटगृहात पाहता येईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com