मिलिंद उतरला आमिरच्या समर्थानात...
बॉलीवूड अभिनेता आमिर खान (Amir Khan) यांचा 'लाल सिंग चड्ढा' (Laal Singh Chaddha) हा चित्रपट 11 ऑगस्टला रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. रिलीजपूर्वीच आमिरचा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे. सोशल मीडियावर चित्रपटाबद्दल बहिष्कार टाकण्याची मागणी सातत्याने होत आहे. यासंदर्भात आमिर खाननेही अनेकांना चित्रपट पाहण्याचे आवाहन केले होते. आता 'लाल सिंह चड्ढा'वर बहिष्कार टाकण्याच्या मागणीवरून अभिनेता मिलिंद सोमण (Milind Soman) हा आमिरच्या बाजूने उतरला आहे.
खरं तर सोशल मीडियावर उठलेल्या 'लाल सिंह चड्ढा'वर बहिष्कार टाकण्याच्या मागणीने आमिर खान नाराज झाला होता. एवढेच नव्हे तर आमिरने स्वतः असं सांगितलं की चित्रपटावर बहिष्कार टाकू नये असे आवाहन करत चित्रपट आवर्जून पाहण्यास सांगितले. यानंतर आमिर खानची इंडस्ट्रीतील लोकांशी एक-एक करून सोबत होऊ लागली आहे.
आता या संपूर्ण वादावर अभिनेता मिलिंद सोमणने ट्विटरवर एक ट्विट केले आहे. आमिर खानच्या चित्रपटाचे समर्थन करत मिलिंदने या ट्विटमध्ये लिहिले की ट्रोल्स चांगल्या चित्रपटाला रोखू शकत नाहीत....
आमिर खानचे जुने विधान आणि लाल सिंह चड्ढा यांच्याबाबत असहिष्णुतेचे वक्तव्य पाहून काही युजर्सनी त्याच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर #BaycottLaalSinghCaddha सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला. चित्रपटावरील बहिष्काराला उत्तर देताना आमिर खान म्हणाला की बरेच लोक म्हणतात की मला भारत आवडत नाही जे पूर्णपणे चुकीचे आहे. मला माझ्या देशावर खूप प्रेम आहे...कृपया माझ्या चित्रपटांवर बहिष्कार टाकू नका माझे चित्रपट पहा असं देखील आमिरने सांगितलं.