Michael Jackson
Michael JacksonTeam Lokshahi

Michael Jackson: मायकेल जॅक्सनला 150 वर्षे जगायचे होते पण...

पॉपचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा मायकल जॅक्सन ज्याने आपल्या गायन आणि नृत्याने संपूर्ण जगात एक वेगळी छाप सोडली आहे.
Published by :
shweta walge
Published on

पॉपचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा मायकल जॅक्सन (Michael Jackson) ज्याने आपल्या गायन आणि नृत्याने संपूर्ण जगात एक वेगळी छाप सोडली आहे. तो एक असा स्टार होता, ज्याला लोक आजही जगाच्या कानाकोपऱ्यात ओळखतात. 25 जून 2009 रोजी लॉस एंजेलिस (Los Angeles) येथे त्याचा मृत्यू झाला होता. वयाच्या अवघ्या 50 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही तुम्हाला त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही गोष्टी सांगणार आहोत.

मायकल जॅक्सनचा जन्म 29 ऑगस्ट रोजी शिकागो नजीक एका लहानश्या गावात झाला. लहानपणापासूनच संगीताची आवड असलेला मायकेल 1964 मध्ये आपल्या भावाच्या पॉप ग्रुपमध्ये सामील झाला. 1982 मध्ये त्याचा 'थ्रिलर' (Thriller) अल्बम रिलीज झाल्यावर त्याला जगभरात ओळख मिळाली. या अल्बमनंतर त्याची लोकप्रियता वाढली. हा जगातील सर्वाधिक विकला जाणारा अल्बम आहे.

मायकल जॅक्सनला 150 वर्षे जगायचे होते पण मायकेल वयाच्या 50 व्या वर्षी निधन झाले.यासाठी त्यांनी 12 डॉक्टरांची टीम ठेवली होती, जी नेहमी त्यांच्यासोबत असायची. ही टीम त्यांची नियमित तपासणी करत असे. एवढेच नाही तर तो ऑक्सिजन बेडवर झोपायचा आणि कोणालाही भेटण्यापूर्वी मास्क आणि हातमोजे घालायला विसरत नव्हता. योगासने करण्यासाठी त्यांनी 15 जणांची टीमही सोबत ठेवली होती. मायकल जॅक्सनचा मृत्यू ड्रग्जच्या ओव्हरडोजमुळे झाल्याचे बोलले जाते. मायकलने स्वतःला चांगले दिसण्यासाठी त्याच्या अनेक शस्त्रक्रिया देखील केल्या होत्या, कुठेतरी त्या शस्त्रक्रिया देखील त्याच्या मृत्यूचे कारण मानले जातात.

मायकल जॅक्सन हा जगातील सर्वाधिक पुरस्कार विजेते कलाकार आहे. त्याच्या नावावर 23 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Records) आहेत. त्याचवेळी मायकल जॅक्सनच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचे झाले तर त्याने 1994 मध्ये लिसा मेरी प्रिस्लेसोबत लग्न केले, परंतु 19 महिन्यांनंतर दोघांचा घटस्फोट झाला. 1997 मध्ये, त्याने नर्स डेबी रोसोबत दुसरे लग्न केले. यातून त्यांना प्रिन्स मायकल आणि पॅरिस मायकल कॅथरीन ही दोन मुले झाली. पण मायकलचे हे लग्नही १९९९ मध्ये तुटले.

Michael Jackson
Pankaj Tripathi : मी अभिनेता झालो नसतो तर शेतकरीच असतो
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com