मनोरंजन
पतीच्या आठवणीत मंदिरा बेदी भावूक
अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांच्या अकाली निधनाने सा-यांनाच मोठा धक्का बसला. पतीच्या मृत्यूनंतर मंदिरा एकटी पडली आहे. पतीच्या आठवणीत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना दिसते. मंदिराच्या या पोस्टवर तिचे बरेच मित्रमंडळी कमेंट करत तिचे सांत्वन करत आहेत. राज कौशल सिनेइंडस्ट्रीतले प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता होते.
राज कौशलचे ३० जूनला हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. निधनानंतर मंदिरा बेदी पूर्णपणे कोलमडून गेली आहे.पतीच्या आठवणीत मंदिराने पुन्हा एक पोस्ट शेअर केली आहे. अशा कठिण काळात सारेच तिला धीर देत आहेत. राज कौशलच्या सगळ्या आठवणी तिच्या मनात दाटून आल्या आहेत. पतीसोबतचे काही फोटो शेअर करत तिने म्हटले की, '25 वर्षे एकमेकांना ओळखून आणि लग्नाला 23 वर्षे झाली… पोस्ट शेअर करत पुन्हा मंदिरा पतीच्या आठवणीत भावूक झाली.