Major
MajorTeam Lokshahi

Major : आदिवी शेषने दिली 'सम्राट पृथ्वीराज'ला टक्कर, केली तुफान कमाई

जर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित 'मेजर' चित्रपटात आदिवी शेषने मुख्य भूमिका साकारली होती.
Published on

मेजर संदीप उन्नीकृष्णन (Sandip Unnikrishnan) यांच्या जीवनावर आधारित 'मेजर' चित्रपटात आदिवी शेषने (Adivi Shesha) मुख्य भूमिका साकारली होती. मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात देशासाठी लढताना संदीप उन्नीकृष्णन यांना प्राण गमवावे लागले होते. 'मेजर' हा चित्रपट 3 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. याच दिवशी अक्षयचा 'सम्राट पृथ्वीराज' हा देखील रिलीज झाला. 'मेजर' अक्षय कुमारच्या चित्रपटाला तगडी टक्कर देत आहे. या बिग बजेट चित्रपटापुढे 'मेजर' कितपत तग धरू शकेल असे सर्व प्रकारचे अंदाज बांधले जात होते. मात्र कथानकाच्या जोरावर तो प्रेक्षकांना खेचण्यात यशस्वी ठरला. चित्रपटाची ओपनिंग चांगली होती आणि दोन दिवसीय बॉक्सऑफिस कलेक्शन देखील चांगले झाले आहे.

Major
Bollywood Celebs Corona Positive : बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण

'मेजर' चित्रपटाच्या पहिल्या दिवसीय कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर जगभरात 13.4 कोटी कमावले आहेत. शनिवारी 11.10 कोटी जमा झाले. अशा प्रकारे दोन दिवसांमध्ये चित्रपटाचे जगभरात 24.50 कोटींचे कलेक्शन झाले आहे. समीक्षकांकडूनही 'मेजर'चे तोंड भरून कौतुक केले जात आहे. चित्रपटाला चांगले रिव्ह्यू मिळाले असून याचा फायदा चित्रपटाला होताना दिसत आहे.

चित्रपटात आदिवी शेष यांच्यासह सई मांजरेकर, शोभिता धुलिपाला, प्रकाश राज, रेवती आणि मुरली शर्मा यांच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक शशी किरण टिक्का यांनी केलेलं आहे. महेश बाबूच्या प्रोडक्शन हाऊसने या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे.

Major
Spruha Joshi : तगडी स्टारकास्ट असलेल्या "मीडियम स्पाइसी" मध्ये दिसणार स्पृहा जोशी
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com