महाराष्ट्रात नंगा नाच चालू देणार नाही : चित्रा वाघ
भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेदमध्ये मागील काही दिवसांपासून ट्विटर वॉर चांगलेच रंगले आहे. चित्रा वाघ यांनी पोलिसांत उर्फीविरोधात तक्रारही दाखल केली होती. शिवाय उर्फीनेही चित्रा वाघ यांना उत्तर दिलं होतं. त्यानंतरपासून चित्रा वाघ आणि उर्फी जावेदचे आरोप प्रत्यारोप सुरुच आहे. “असा नंगानाच आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही.” असं म्हणत चित्रा वाघ यांनी उर्फीवर पुन्हा टिका केली.
चित्रा वाघ म्हणाल्या की, अंगावर नगण्य कपडे घालून सार्वजनिक ठिकाणी ओंगळवाणे प्रदर्शन केल्याचा व्हिडीओ एका महिलेने मला दाखवला. दीड वर्षांपुर्वी या महिलेची मुलगी घाणेरड्या विकृतीला बळी पडली असे तिने मला सांगितले व या विकृतीला कुणी जाब विचारणार की नाही असे म्हटले. त्यानंतर आम्ही हीच भुमिका घेतली. आता आम्ही हा नंगानाच चालू देणार नाही.
पुढे त्या म्हणाल्या की, विरोध धर्माला नाही परंतु, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात नंगानाच सुूरु आहे त्या विकृतीला विरोध आहे. उर्फीला विरोध नाही तर तिच्या नंगा नाचला विरोध आहे. कुणी काय कपडे घालावे आणि कुणी घालू नये. यावर काय बोलावे. आधी कपडे तर घाला मग ठरवा.
समाजाचे स्वास्थ महत्वाचे आहे. तिथे राजकारण करायची गरज नाही. पण तसे राज्यात झाले नाही. राज्यात सार्वजनिक ठिकाणी नंगा नाच सुरू आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का? याचे उत्तर उर्फीला समर्थन करणाऱ्यांनी द्यावे. व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर स्वैराचार झालाय. असला नंगा नाच चालू देणार नाही.
दरम्यान, नुकताच उर्फी जावेदचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात ती माझा नंगा नाच असाच सुरू राहणार असे म्हणाली आहे. असे बिनधास्त वक्तव्य करत तिने चित्रा वाघ यांना जोरदार टोला लगावला आहे,