'महाराष्ट्र शाहीर' लवकरच ओटीटीवर होणार रिलीज; कधी, कुठे पाहता येणार चित्रपट?

'महाराष्ट्र शाहीर' लवकरच ओटीटीवर होणार रिलीज; कधी, कुठे पाहता येणार चित्रपट?

शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे यांच्या जीवनावर आधारित महाराष्ट्र शाहीर चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला.
Published on

शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे यांच्या जीवनावर आधारित महाराष्ट्र शाहीर चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला. बहरला हा मधुमास हे गाणं आजही सोशल मीडियावर ट्रेंड होताना पाहायला मिळत आहे. हा चित्रपट आता लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे. अमेझॉन प्राईमवर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

केदार शिंदे दिग्दर्शित महाराष्ट्र शाहीर चित्रपटात शाहीर साबळे यांच्या भूमिकेत अंकुश चौधरी झळकला असून सना शिंदे, निर्मिती सावंत, अश्विनी महांगडे, शुभांगी सदावर्ते हे प्रमुख भूमिकेत आहेत. तर या चित्रपटाच्या संगीताची धुरा अजय-अतुल यांनी सांभाळली आहे. 28 एप्रिल रोजी महाराष्ट्र शाहीर चित्रपट रिलीज झाला होता. पहिल्याच आठवड्यात सुसाट सुटलेल्या या चित्रपटाला मात्र काही दिवसांनी थंड प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने आतापर्यंत 5.68 कोटींचा गल्ला जमविला आहे. आता येत्या 2 जूनपासून महाराष्ट्र शाहीर हा सिनेमा अमेझॉन प्राइमवर पाहायला मिळणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com