लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आशा भोसले यांना जाहीर; तसेच प्रसाद ओक, विद्या बालन यांचाही सन्मान
मंगेशकर कुटुंब गेल्या 33 वर्षांपासून नोंदणीकृत सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट, मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान चालवत आहेत. यंदाचा प्रतिष्ठित दीनानाथ पुरस्कार आणि ट्रस्टच्या इतर पुरस्कारांचा वितरण सोहळा हा 24 एप्रिल 2023 रोजी श्री षण्मुखानंद हॉल, सायन येथे आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यात मंगेशकर प्रतिष्ठानतर्फे संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, व्यावसायिक आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जातो. यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यात पंकज उदास, प्रसाद ओक, विद्या बालन यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार
श्री सदगुरु सेवा संघ ट्रस्ट- (समाजसेवेच्या क्षेत्रात समर्पित सेवा)
वागविलासिनी पुरस्कार - ग्रंथाली प्रकाशन - (साहित्य क्षेत्रात समर्पित सेवा)विशेष वैयक्तिक पुरस्कार- पंकज उदास (भारतीय संगीत),
सर्वोत्कृष्ट नाटक- प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनचे गौरी थिएटर्सचे 'नियम व अटी लागू'
विशेष पुरस्कार - श्री.प्रसाद ओक (चित्रपट आणि नाटक क्षेत्रात समर्पित सेवा)
विशेष पुरस्कार- विद्या बालन (चित्रपट क्षेत्रात समर्पित सेवा)