अकॅडमी अवॉर्ड्स साठी भारतातून “कूळंगल”
सिनेसृष्टीत अतिशय मानाचा समजला जाणाऱ्या ऑस्कर पुरस्काराला भारताकडून "कूळंगल" हा तामिळ चित्रपट जाणार आहे. हा एक सामाजिक चित्रपट असून दिग्दर्शक पी.एस. विनोथराज यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.
"कूळंगल"ची कथा एका चिमुकल्याचा माहेरी गेलेल्या त्याच्या आईला परत आणन्याचा प्रयत्नांभोवती आहे. व्यसनाच्या आहारी गेलेले त्याचे वडिल, गरीबी, आईला होणारी मारहाण, यासगळ्यामुळे हा चिमुकला वयाआधीत प्रौढ झाला आहे. दुष्काळग्रस्त भागातुन प्रवास करणाऱ्या या बापलेकाची गोष्ट सांगताना दिग्दर्शकाने भौगोलीक प्रतिकांचा पुरेपूर वापर केला आहे.
दक्षिण चित्रपटसृष्टी बरेचदा सामाजिक भान जपणारे चित्रपट देत असते. जातीवादावर भाष्य करणारा 'मेलविलासम्' किंवा 'कर्णन्', धर्माचा आड घेउन होणारे गुन्हे सांगणारा 'एजन्ट साई श्रीनिवास अथ्रेया', सायकोथ्रीलर 'भागामथी', असे एक न अनेक सिनेमे दाक्षिणात्य सिनेसृष्टी आपल्या प्रेक्षकांच्या भेटीसीठी आणत असते.