king JD
king JDTeam Lokshahi

‘किंग जेडी’ने केली ‘गणराज स्टुडिओ’ची स्थापना

मराठीतील पहिला रॅपर, निर्माता, दिग्दर्शक श्रेयश जाधव उर्फ ‘किंग जेडी’ याने अल्पावधितच सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.
Published by :
shweta walge
Published on

मराठीतील पहिला रॅपर, निर्माता, दिग्दर्शक श्रेयश जाधव उर्फ ‘किंग जेडी’ (king JD) याने अल्पावधितच सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. मराठी प्रेक्षकांना जबरदस्त रॅप साँग, बाबू बँड बाजा सारखा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट, मी पण सचिन, बघतोस काय मुजरा कर, बस स्टॅाप असे अनेक यशस्वी चित्रपट दिल्यानंतर आता श्रेयशचा (Shreyas Jadhav) प्रवास आणखी एक पाऊल पुढे गेला आहे. श्रेयशने ‘गणराज स्टुडिओ’ची (Ganaraj Studio) स्थापना केली असून या अंतर्गत एडिटिंग, डबिंग, व्हीएफएक्स साउंड मिक्स अगदी फ़ाइनल आउट्पुट्सपर्यंत सर्व पोस्ट प्रॅाडक्शन सेवा उपलब्ध होणार आहे.

नुकताच या स्टुडिओचा लोकार्पण सोहळा चित्रपट दिग्दर्शक अनिस बाझमी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी अभिनेता स्वप्नील जोशीसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

गणराज स्टुडिओच्या स्थापनेबाबत श्रेयश जाधव म्हणतो, ‘’गणराजचा प्रवास आता एक पाऊल आणखी पुढे गेला आहे. ‘गणराज स्टुडिओ’मुळे आता एकाच छताखाली चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत. बेसलाइट २, डोल्बीअटमोस, ९.१ मिक्सिंग इत्यादी अत्याधुनिक सुविधासह इतक्या वर्षांच्या अनुभवातून दर्जेदार कलाकृतींची निर्मिती करण्याच्या दृष्टीने या स्टुडिओची स्थापना करण्यात आली आहे.’’

king JD
Neha Kakkar Birthday : आई-वडीलांना जन्मापूर्वीच नकोशी झाली होती नेहा, कारण...
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com