आम्ही कलाकार आहोत, कोणाचे मिंधे नाही? महाराष्ट्र शाहीरमधील वाक्याचा नेमका अर्थ केदार शिंदेंनी सांगितला

आम्ही कलाकार आहोत, कोणाचे मिंधे नाही? महाराष्ट्र शाहीरमधील वाक्याचा नेमका अर्थ केदार शिंदेंनी सांगितला

लोकशाही मराठी या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2023' या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्र शाहीरच्या टीमने हजेरी लावली होती.
Published on

मुंबई : लोकशाही मराठी या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2023' या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्र शाहीरच्या टीमने हजेरी लावली होती. यावेळी कलाकरांनी आणि निर्मात्यांनी दिलखुलास संवाद साधला. चित्रपटातील मिंधे या वाक्याचा अर्थ राजकारणाशी लावण्यात येत आहे. याबाबत बोलताना केदार शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

लोक कलावंत लोकांनी बनविले. महाराष्ट्र शाहीर लोकांनी दिलेली पदवी आहे. समाजाचं काही देणं लागतो हे देणं आहे ते महाराष्ट्र शाहीरच्या रुपाने केला आहे. आताच्या पिढीचा विचार करता तो कसा मांडायचा हा चॅलेंज होते, असे केदार शिंदे म्हणाले आहेत.

शाहीर बाबा अलौकीक आणि अद्भूत होते. त्यांनी आयुष्यभर त्तव सोडली नाही. आयुष्यभर त्यांनी चारित्र्याला व नावाला डाग लागू दिला नाही. त्यांची राजकीय सामजिक जाणीव वेगळी होती. तरी ते कमर्शिअलही होते. जेजुरीच्या खंडेराया या गाण्यातून त्यांनी काहीतरी सांगायचा प्रयत्न केला. मला हेही तेच साध्य करायचे. मला ती गोष्ट मनात रुजवायची आहे. मनावर अधिराज्य करायचे आहे पडद्यावर नाही. चित्रपट पाहायला येणारे कित्येक पिढ्यासाठी शाहीर साबळे घेऊन जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

चित्रपटातील मिंधे या वाक्याचा अर्थ राजकारणाशी लावण्यात येत आहे. याबाबत बोलताना केदार शिंदे म्हणाले, सोशल मीडियाच्या प्रभावाखाली ते वाक्य उचलून धरले गेले आहे. कोणतीही चर्चेचा आधार न घेता ही फिल्म सादर झाली पाहिजे. काही गोष्टी सत्य आहेत ते सत्य आहेत. बाळासाहेब यांचे ते जवळचे मित्र होते. शिवसेनेच्या जडण-घडणीमध्ये शाहीरांचा मोठा वाटा होता. त्यावेळेचा घटना मांडण्याचा प्रयत्न मी केला आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यासमोर ही लाईन आहे आम्ही कलाकार आहोत मिंधे कोणाचे नाही. हे वाक्याचा अर्थ पूर्ण सीन बघितल्यानंतर कळेल. हे बघा आणि अर्थ समजून घ्या, असा आवाहन त्यांनी प्रेक्षकांना केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com