Kareena Kapoor : “सैफने आधीच…”गरोदर असल्याच्या चर्चांवर करीनाचे स्पष्टीकरण

Kareena Kapoor : “सैफने आधीच…”गरोदर असल्याच्या चर्चांवर करीनाचे स्पष्टीकरण

अभिनेत्री करिना कपूर खान ( Kareena Kapoor Khan) हिने तिच्या अभिनयाने आणि ग्लॅमरस अंदाजाने प्रेक्षकांच्या मनावर चांगलेच राज्य केलं आहे. करिना कपूर खान सोशल मिडियावर जास्त सक्रिय आहे. सध्या करीना कपूर खान लंडनमध्ये कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत होते.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

अभिनेत्री करिना कपूर खान ( Kareena Kapoor Khan) हिने तिच्या अभिनयाने आणि ग्लॅमरस अंदाजाने प्रेक्षकांच्या मनावर चांगलेच राज्य केलं आहे. करिना कपूर खान सोशल मिडियावर जास्त सक्रिय आहे. सध्या करीना कपूर खान लंडनमध्ये कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत होते. करीनाने सोशल मिडियावर एक फोटो शेअर केला होता. पती सैफ अली खान, मुलं तैमुर आणि जेह यांच्यासोबतचे फोटो शेअर केले होते. या फोटो सोबत करिनाचा एक खास फोटो खूप जास्त व्हायरल होत आहे. ज्यामुळे तिचे चाहते देखील गोंधळले आहे. या फोटोमध्ये करीनाचा बेबी बंप दिसत होता. या फोटोवरून करीना पुन्हा एकदा गरोदर असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या.

करीना ( Kareena Kapoor Khan) खरंच गरोदर असल्याचा अंदाज चाहते लावताना दिसत होते. जवळपास सर्वच फोटोमध्ये करीना कुठेतरी मागे उभी असलेली किंवा सैल कपडे घातलेली किंवा पोट लपवताना दिसत होती. यासर्व पार्श्वभूमीवर या चर्चांना करीनाने पूर्णविराम दिला आहे.

Admin

करीना म्हणाली की, नुकतंच तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिने ती पुन्हा गरोदर नसल्याचे स्पष्ट केले आहे. “मी गरोदर नाही. हा सर्व पास्ता आणि वाईनचा परिणाम आहे आणि सैफच्या मते त्याने आधीच देशाची लोकसंख्या वाढवण्यासाठी खूप योगदान दिले आहे”, असे स्पष्टीकरण दिलं आहे.

Kareena Kapoor : “सैफने आधीच…”गरोदर असल्याच्या चर्चांवर करीनाचे स्पष्टीकरण
घटस्फोटाबद्दल विचारताच समांथाने केले करण जोहरवर आरोप म्हणाली...
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com