Karan Johar : म्हणूनच करण वळला दिग्दर्शनाकडे
बॉलिवूडचा सुप्रदिद्ध चित्रपट निर्माता म्हणून नामांकित असणारा करण जोहर (Karan Johar) आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना नेहमीच भावूक करत असतो. तो दिग्दर्शकासोबत (Director)पटकथा लेखक व त्याचबरोबर कॉस्च्युम डिझायनर देखील आहे. करणने इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याला कोणाच्याही परिचयाची गरज नाही. करण जोहरचा (Karan Johar) जन्म २५ मे १९७२ रोजी मुंबईत झाला. तो निर्माता यश जोहर यांचा मुलगा आहे. करणच्या वडिलांना आपल्या मुलाने अभिनेता व्हावे अशी इच्छा होती पण करणने दिग्दर्शनात आपले करिअर घडवले. करणने अभिनयाच्या विश्वात प्रवेश केला होता. परंतु तो काही अप्रतिम अभिनय करू शकला नाही. यानंतर दिग्दर्शनाकडे परत जाणेच हेच त्याने स्वीकारले. करणबद्दल आम्ही तुम्हाला त्याच्याशी संबंधित काही खास गोष्टी सांगत आहोत.
करण जोहरने 'कुछ कुछ होता है' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले. या चित्रपटात त्याने त्याचा खास मित्र शाहरुख खान(Shah Rukh Khan) याला कास्ट केले होते. करणचा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाने अनेक पुरस्कारही आपल्या नावी केले होते.
'कुछ कुछ होता है' नंतर करणने कभी खुशी कभी गम, माय नेम इज खान, कभी अलविदा ना कहना, ए दिल है मुश्किल, लस्ट स्टोरीज, स्टुडंट ऑफ द इयर आणि घोस्ट स्टोरीज दिग्दर्शित या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. करणचे हे सर्व चित्रपट सुपरहिट देखील ठरले होते. करण त्याचा आगामी 'रॉकी अँड राणी की प्रेमकथा' या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटात आलिया भट्ट, रणवीर सिंग, शबाना आझमी, जया बच्चन आणि धर्मेंद्र दिसणार आहेत. करणच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.