करण जोहरने ट्विटरला केलं अलविदा म्हणाला, मी आणखी...
बॉलीवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर कायम वेगवेगळ्या विषयावरून चर्चेत असतो. आता पर्यंत करण जोहरवर अने गंभीर आरोप देखील करण्यात आले आहेत. परंतु वारंवार होणाऱ्या आरोपाला कंटाळून करणने आता ट्विटला अलविदा केलं आहे.
करणने त्याच्या अकाऊंटवरून शेवटी एक पोस्ट लिहिली आहे. तो म्हणाला की, मी आणखी सकारात्मक उर्जेसाठी जागा निर्माण करत आहे, आणि हे त्या दिशेने एक पाऊल आहे. गुडबाय ट्विटर! करणने अचानक अशा प्रकारे ट्विटर सोडल्याने लोकांना ते आवडत नाही. त्यावर अनेकांकडून टीका देखील केली जात आहे.
आता करण जोहरने आधीच निरोप घेतला आहे. ही त्यांची शेवटची पोस्ट होती. चाहते याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. अखेर करणने ट्विटर सोडण्याचा निर्णय का घेतला? करणने एवढ्या मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला अलविदा करण्याचे कारण काय होते? करण जोहरने खरोखरच ट्विटर सोडले आहे की हा विनोद आहे?
करण जोहरवर अनेकदा नेपोटिझम आणि स्टार किड्सला प्रोत्साहन दिल्याचे आरोप झाले आहेत. ते काहीही पोस्ट करत असले तरी वापरकर्ते त्यांना ट्रोल करण्याची संधी सोडत नाहीत. अलीकडेच, कॉफी विथ करण चॅट शोमध्येही लोकांनी त्याला त्याच्या वागण्यावरून ट्रोल केले. प्रत्येक एपिसोडमध्ये आलियाचे प्रमोशन करणे, सारा आणि जान्हवी यांच्यात जान्हवीला सपोर्ट करणे यासाठी त्याला टोमणे मारण्यात आले. त्यामुळेच करणने ट्विटरला अलविदा केल्याचे मानले जात आहे.