छोट्या पडद्यावरील कपिल शर्माचा जीवनपट आता मोठ्या पडद्यावर…

छोट्या पडद्यावरील कपिल शर्माचा जीवनपट आता मोठ्या पडद्यावर…

Published by :
Published on

सध्या चित्रपटसृष्टीत विशेषतः बाॅलीवूडमध्ये एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यावर आधारीत चित्रपट अर्थात बायोपिक मोठ्या प्रमाणात बनवले जात आहेत. क्रीडा, राजकीय, सामाजिक, सांस्कृतीक अशा विविध क्षेत्रांतील व्यक्तींवर आधारीत अनेक बायोपिक्स आजवर बाॅलीवूडमध्ये बनल्या.आता छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध काॅमेडियन कपिल शर्माच्या आयुष्यावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सुप्रसिद्ध काॅमेडियन कपिल शर्माच्या आयुष्यावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन 'मृगदीप लाम्बा' करणार आहेत. लाम्बा यांनी यापूर्वी फुक्रे(2013) व फुक्रे रिटर्न्स(2017) ह्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाला 'फनकार' असे नाव देण्यात येणार आहे.

अमृतसरमध्ये जन्मलेल्या कपिलच्या संघर्षापासून ते छोट्या पडद्यावरील अतिशय यशस्वी कलाकार हा संपुर्ण प्रवास ह्या चित्रपटात दाखवला जाणार आहे. "देशातील सर्वात लोकप्रिय कपिल शर्माचा प्रवास प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी मी उत्सुक आहे" असे लाम्बा म्हणाले. ह्या चित्रपटाची निर्मिती महावीर जैन व लायका प्रोडक्शन एकत्रितपणे करणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com