कंगनाने साजरा केला स्वातंत्र्य दिन, राजकीय भूमिका असलेल्या चित्रपटाची घोषणा
देशात आज मोठ्या जल्लोषात 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दिनी विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळीने आपआपल्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहे. नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री कंगनाने देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहे. कंगना राणावतने या आठवड्याच्या सुरुवातीला तिच्या चाहत्यांना सांगितले होते की, तिला डेंग्यूचा त्रास होत आहे, दरम्यान डेंग्यूचा त्रास असताना तिने भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे मोठ्या उत्साहाने साजरी केला आहे. कंगनाने तिच्या इंस्टाग्रामवर दोन व्हिडिओ शेअर केले ज्यामध्ये ती भारतीय ध्वजासह दिसतेय. कंगनाने एक छोटीशी चिठ्ठी शेअर केली आहे की ती तिच्या आजारपणामुळे तिची खोली सोडू शकत नसली तरी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी तिचे मन तिला थांबवू शकले नाही.
काय म्हणाली कंगना शुभेच्छात ?
पहिल्या व्हिडिओमध्ये कंगना तिच्या सोफ्यावर बसून भारतीय ध्वज फडकवताना दिसत आहे. तिने व्हिडिओला "सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा" असे कॅप्शन दिले आहे. तिच्या पुढील इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये तिच्या हातामध्ये कॅन्युला असलेला, अंथरुणावर पडलेला तिचा एक फोटो आहे. तिने त्याला कॅप्शन दिले आहे, "राष्ट्रीयतेच्या भावनेने माझ्या खोलीतून बाहेर पडू शकलो नाही. उत्सवाने मला सर्वात सशक्त मार्गाने ताब्यात घेतले आहे. माझ्या घरातील कर्मचारी, परिचारिका आणि गार्डनर्स या सर्वांनी एकमेकांचे अभिनंदन केले, मी आज सकाळी माननीय पंतप्रधानांचे भाषण ऐकले."
तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण पाहिल्याचेही शेअर केले. कॅन्युला असलेल्या तिच्या हाताच्या प्रतिमेसोबत, ती पुढे म्हणाली, "ते म्हणतात की एक व्यक्ती जग बदलू शकते, हे आमचे पंतप्रधान मोदी यांच्यावर खरे उतरले आहे, मी माझ्या आयुष्यात कधीही राष्ट्रवाद, कर्तव्य आणि भविष्यासाठी आशावाद पाहिला नाही. बहुधा अशाच एका विशाल चेतनेला आपण अवतार म्हणतो. जे केवळ उठू शकत नाहीत तर शेकडो किंवा हजारो नव्हे तर संपूर्ण मानवजातीचे उत्थान करू शकतात...जय हिंद."
एका राजकीय मोठ्या व्यक्तीची भूमिका असणाऱ्या चित्रपटाची केली घोषणा
इंदिरा गांधींनी घोषित केलेल्या अंतर्गत आणीबाणीच्या स्थितीबद्दलचा हा इमर्जन्सी चित्रपट असणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबतच कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिकाही साकारताना दिसणार आहे. यापूर्वी, कंगनाने थलायवीमध्ये दिवंगत तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता आणि मणिकर्णिकामध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट केवळ अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम केला जाणार आहे.
कॉंग्रेसचा या चित्रपटावर आक्षेप
कंगना राणावत आणि वाद हे समीकरण अत्यंत जुनेच आहे. कंगनाचा कोणताही चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकल्याशिवाय पुर्ण होतच नाही. आता कंगनाचा आगामी चित्रपट इमर्जन्सी देखील वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याबाबत मध्य प्रदेश काँग्रेसने आरोप केला आहे की, चित्रपटाच्या माध्यमातून नेहरू-गांधी परिवाराला बदनाम करण्याचा डाव आहे. या चित्रपटाच्या नुकताच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये कंगना रनौत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची प्रमुख भूमिका साकारत असल्याचे स्पष्ट दिसते आहे.