वादात सापडलेल्या आदिपुरुष चित्रपटावर कालीचरण महाराजांची प्रतिक्रिया; केली 'ही' मागणी
आदिपुरुष या चित्रपटावरून सध्या प्रचंड वादंग सुरू आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून त्यावर बंदी घालण्याची मागणी होत आहे. चित्रपटातील आक्षेपार्ह संवाद वादाचे कारण ठरले आहे. आदिपुरुषला ओपनिंग चांगलं मिळालं मात्र या सिनेमातली भाषा, प्रभू रामाचं चित्रण, सीतेच चित्रण, रावणाचे प्रसंग या सगळ्यावरच बहुतांश प्रेक्षकांनी आक्षेप घेतला आहे. यावरच आता कालीचरण महाराजांनी प्रतिक्रिया देत चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
नेमकं काय म्हणाले कालीचरण महाराज?
आदिपुरुष या चित्रपटावर बोलताना कालीचरण महाराज म्हणाले की, आदिपुरुष या चित्रपटात दाखवलेल्या घटना हिंदू विरोधी आहेत. यासोबतच देवाच्या चरित्राचा अपमान करणारे संवाद यामध्ये वापरण्यात आले आहेत. हा प्रकार निंदनीय आहे. हिंदूंच्या इतिहासाचं विकृतीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे. आदिपुरुष चित्रपट मी पाहिलेला नाही. जे लोक या चित्रपटाला पाठिंबा देत आहेत ते धर्मविरोधी आहेत. ज्यांना वाईट वाटतं आहे ते धर्मप्रेमी आहेत. जे धर्मप्रेमी आहेत त्यांनी या चित्रपटावर बहिष्कार घातला पाहिजे. असे मागणी त्यांनी यावेळी केली.