Janhvi Kapoor: जान्हवी कपूरने अखेर लग्नाच्या प्रश्नांवर दिला फुलस्टॉप, एका मुलाखती दरम्यान म्हणाली...

Janhvi Kapoor: जान्हवी कपूरने अखेर लग्नाच्या प्रश्नांवर दिला फुलस्टॉप, एका मुलाखती दरम्यान म्हणाली...

लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी कपूर बॉलीवूडमधील नामवंत अभिनेत्री तसेच स्वर्गवासी श्रीदेवी आणि दिग्दर्शक बोनी कपूर यांची मोठी मुलगी आहे. पण सध्या जान्हवी कपूर ही तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टींमुळे फार चर्चेत आली आहे. जान्हवी कपूरच्या लव्हलाईफबद्दल सध्या फार बोललं जात आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी कपूर बॉलीवूडमधील नामवंत अभिनेत्री श्रीदेवी आणि दिग्दर्शक बोनी कपूर यांची मोठी मुलगी आहे. बॉलीवूडमधील स्टरकिड्समध्ये जान्हवी कपूर हे नाव आवर्जून घेतलं जातं. जान्हवी कपूर तिच्या नुकत्याच आलेल्या चित्रपटांमुळे चर्चेत आलेली आहे. तिच्या अभिनयामुळे आणि सौंदर्याने ती नेहमीच चाहत्यांना भुरळ पाडून ठेवते. पण सध्या जान्हवी कपूर ही तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टींमुळे फार चर्चेत आली आहे. जान्हवी कपूरच्या लव्हलाईफबद्दल सध्या फार बोललं जात आहे.

जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांच्या नात्याबद्दल चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं आहे. हे दोघे एकामेकांना कित्येक वर्षापासून डेट करत असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या विवाहसोहळ्या दरम्यान एकत्र आलेले दिसले होते. तर कॉफी विथ करण या कार्यक्रमामध्ये जान्हवीने आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. शिखर पहाडिया हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नातू आहेत.

पिंकव्हिलाला झालेल्या नुकत्याच एका मुलाखतीत जान्हवी कपूरला ती शिखर पहाडियासोबत लग्न कधी करणार असा प्रश्न विचारला गेला. यावर जान्हवी कपूर म्हणाली, मी आणि शिखर पहाडिया आम्ही दोघे ही आमच्या वैयक्तिक आयुष्यात व्यस्त आहोत. त्यामुळे माझ्याकडे आणि त्याच्याकडे वेळ नाही आहे, असं म्हणतं जान्हवी कपूरने तिच्या लग्नासंबंधीच्या प्रश्नांवर पुर्णविराम दिला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com