मनोरंजन
जय श्री हनुमान! हनुमान जयंतीनिमित्त श्रीकांत शिंदेंनी केले हनुमान चालीसा पठण
आज श्री हनुमान जन्मोत्सव. श्री हनुमान हे शक्ती, प्रेरणा, सात्विकता आणि भक्तिचं प्रतिक. हीच शक्ती, भक्ती आणि प्रेरणा देणारी हनुमान चालीसा आपण आवर्जून म्हणतो, ऐकतो.
पवन तनय संकट हरन, मंगल मूरति रूप।
राम लखन सीता सहित, हृदय बसहु सुर भूप।।
आज श्री हनुमान जन्मोत्सव. श्री हनुमान हे शक्ती, प्रेरणा, सात्विकता आणि भक्तिचं प्रतिक. हीच शक्ती, भक्ती आणि प्रेरणा देणारी हनुमान चालीसा आपण आवर्जून म्हणतो, ऐकतो. आज माझ्या आवाजात ध्वनिमुद्रित झालेली हनुमान चालीसा प्रसारित होत आहे. माझ्यासाठी हा एक वेगळाच अनुभव देणारा क्षण आहे. घरात देव्हाऱ्यात देवासमोर, मंदिरात सर्वांसमोर म्हटलेली हनुमान चालीसा आज या माध्यमातून प्रसारित होणे, हे मी भाग्य समजतो.
आज श्री हनुमान जन्मोत्सवच्या शुभ प्रसंगी माझ्या आवाजातील श्री हनुमान चालीसा श्री हनुमानाच्या चरणी अर्पण करतो. माझा हा प्रयत्न आपण स्वीकारावा, श्री हनुमानाची कृपादृष्टी आपल्यावर सदैव राहो.
धन्यवाद !
सियावर रामचंद्र की जय,
पवनसूत हनुमान की जय…