Aai Kuthe Kay Karte: ईशाने अरुंधतीला विचारला धक्कादायक प्रश्न!
सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' ही मालिका चर्चेत आहे. या मालिकेतील ईशा आणि अनिशने पळून जाऊन लग्न केले आहे. आता त्यांचे पुन्हा एकदा साध्या पद्धतीने लग्न लावून देण्यात येणार आहेत. देशमुखांच्या अंगणात हे लग्न पार पडणार असते. मात्र, या सगळ्या गोष्टीला ईशाचा विरोध असतो. तिला तिचं लग्न थाटामाटात करायचं असतं. ती सतत अरुंधतीला दोषी मानते. यावेळी तर तिने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. ती अरुंधतीला आता सतत उद्धट बोलत असते.
मालिकेच्या पुढील भागाच्या प्रोमोमध्या दाखवण्यात आले आहे की, अनिश ईशाला म्हणतो की, तुझ्यासाठीच काय तर इतर कोणासाठीही मी माझ्या माणसांना दुखावणार नाही. तेव्हा ईशा म्हणते की हे तू नाही बोलत आहेस, तर तुझ्या तोंडून माझी आई बोलते आहे. ईशा अरुंधतीकडे वळते आणि विचारते की, 'अजून किती कारस्थानं करणार आहेस आई?' यानंतर अरुंधती आशुतोषला सांगते की, अनिश आणि ईशा इंदौरला जातील आणि त्यांना त्यांचे वेगळे घर करुन राहू दे. त्यांना असे बोट धरुन चालवणे बंद केले पाहिजे. आता त्याच्यावर काय परिणाम होईल हे पुढील भागातच स्पष्ट होईल. आता ईशा कुटुंबियांच्या म्हणण्या प्रमाणे लग्न करणार की फॅन्सी लग्न करणार? अरुंधती त्यांना खरच इंदौरला पाठवणार का? ईशाला अरुंधतीचा हा निर्णय मान्य असेल का? अनिश या सगळ्यावर कशी प्रतिक्रिया देणार? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांनी त्यांच्या या प्रश्नाची उत्तरे मिळणार आहेत.