Insidious The Red Door
Insidious The Red Doorsonypicturesin

Insidious The Red Door: हॉरर मुव्ही पहायचयं कधी कुठे? जाणून घ्या

हॉरर चित्रपट पाहणाऱ्यांसाठी एक आंनदाची बातमी आहे
Published by :
shweta walge
Published on

हॉरर चित्रपट पाहणाऱ्यांसाठी एक आंनदाची बातमी आहे. चर्चेत असलेला हॉलिवूडचा Insidious The Red Door हा हॉरर चित्रपट अमेरिकेच्या एक दिवसा आधी भारतात प्रदर्शित होणार आहे. बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेना वाट पाहत होते. तर आता हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

इनसिडियस हा चित्रपट लॅम्बर्ट कुटुंबासोबत घडनाऱ्या भयभीत घटनेवर आधारित आहे. इनसिडियस चित्रपटाचे मूळ कलाकार पॅट्रिक विल्सन, टाय सिम्पकिन्स, रोझ बायर्न आणि अँड्र्यू एस्टर आहेत. यात सिंक्लेअर डॅनियल आणि हिय्याम अब्बास यांच्याही भूमिका आहेत.

6 जुलै 2023 रोजी मध्यरात्री 12 वाजता हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार आहे. Insidious: The Red Door हा Insidious फ्रेंचाइजीमधील पाचवा चित्रपट असणार आहे. राक्षसांच्या दुनियेची झलक देणाऱ्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. हा चित्रपट इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये थिएटरमध्ये दाखल होईल.

Insidious The Red Door
पंतप्रधान मोदींसह हरिनामात दंगले जागतिक नेते, जगभरातील नेत्यांची ग्लोबल वारी

या चित्रपटाची निर्मिती जेसन ब्लम, ओरेन पेली, जेम्स वॅन आणि लेह व्हॅनेल यांनी केली आहे. या चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून दिसणारा अभिनेता पॅट्रिक विल्सनही या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com