कंगना आणि रंगोलीच्या अडचणींमध्ये वाढ

कंगना आणि रंगोलीच्या अडचणींमध्ये वाढ

Published by :
Published on

अभिनेत्री कंगना रणौत आणि तिची बहीण रंगोली चंडेल या दोघीं विरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कंगना आणि रंगोलीसोबतच एकूण चार जणांविरोधात विश्वासघात करणे, फसवणूक करणे आणि कॉपीराइट नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांद्रे न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणी कुमार जैन आणि अक्षय रणौत या दोघांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आलाय.

न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर कंगना आणि इतर चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे. अशी माहिती खार पोलीस स्थानकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक असणाऱ्या गजानन काब्दुले यांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार दिद्दा द वॉरियर क्वीन ऑफ काश्मीरचे लेखक आशीष कौल यांनी आपल्या पुस्तकाची कथा काही दिवसांपूर्वी कंगनाला ईमेलवरुन पाठवली होती. त्यानंतर काही दिवसांनी याच कथेवर आधारित चित्रपटाची घोषणा कंगनाने ट्विटरवरुन केली. मात्र ही घोषणा करण्याआधी कंगाने या कथेचे मूळ लेखक असणाऱ्या कौल यांची परवानगी घेतली नव्हती.

न्यायालयाने या प्रकरणी मुंबई पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी आयपीसी ४०६,४१५,४१८,३४,१२०(ब) आणि कॉपीराइट कायद्याअंतर्गत ५१,६३ आणि ६६ अ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात लवकरच चौघांविरोधात समन्स काढून त्यांना चौकशीसाठी पोलीस स्थानकात बोलवण्यात येईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com