आलियाच्या रिअॅक्शनने वेधले लक्ष, ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये कृष्णाने विचारला ‘हा’ प्रश्न
सध्या सोशल मीडियावर अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट या जोडीबद्दल चर्चा सुरू आहे. या दोघांच्या नात्याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. रणबीर आणि आलिया एकमेकांना डेट करत आहेत, अशी चर्चा आहे. पण याबाबत आलिया आणि रणबीरने कोणतीही माहिती अजून चाहत्यांना सांगितली नाही. 'द कपिल शर्मा शो' या छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शोमध्ये आलियाने हजेरी लावली. यावेळी कृष्णा अभिषेकने आलियाला एक प्रश्न विचारला. हा प्रश्न ऐकताच आलियाला लाजली.
द कपिल शर्मा शोमध्ये कृष्णा अभिषेक म्हणाला की, 'मला 'कपूर अँड सन्स' हा चित्रपट खूप आवडतो.' त्यानंतर तो म्हणला, ' 'कपूर अँड बहू' हा चित्रपट कधी येणार आहे?' असा प्रश्न कृष्णाने विचारताच आलिया लाजली. शोमधील उपस्थित असलेल्यांना कृष्णाचा हा प्रश्न ऐकून हस अनावर झाले .
आरआरआर या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 'द कपिल शर्मा शो' मध्ये आलियाने हजेरी लावली होती. लवकरच रणबीर कपूर आणि आलिया भट यांचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. रिपोर्टनुसार, डिसेंबर 2022 ते जानेवारी 2023 या दरम्यान रणबीर आणि आलियाचा लग्न सोहळा पार पडणार आहे, अशी चर्चा आहे .