सोनू सूदची महिला नेमबाजाला मदत; आता सुवर्ण कामगिरीकडे लक्ष्य
कोरोना काळात परप्रांतीयांना आपल्या घरी जाण्यासाठी जिवाचे रान करणारा अभिनेता सोनू सुद सर्वांना माहितच आहे. बॉलिवूडमध्ये खलनायक म्हणून काम करणारा अभिनेता खऱ्या आयुष्यात हिरो ठरला आहे.
सूद फाऊंडेशनच्या माध्यमातून सोनू सूदने झारखंडच्या नेमबाजला महागडी रायफल घेऊन दिली. कोनिका लायक असे या नेमबाज महीलेचे नाव असून तिने काही दिवसापुर्वी ट्विटच्या माध्यमातून रायफलची मागणी केली होती.
"११व्या झारखंड राज्य रायफल नेमबाज अजिंक्यपद स्पर्धेत मी रौप्यपदक जिंकले. तरीही सरकारकडून मला काहीच मदत मिळत नाही. मला एक रायफल घेऊन मदत करा,"असे कोनिकाने सोनू सूदला सांगितले होते.
कोनिका ही झारखंडमधील धनबाद येथे राहणारी आहे आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी दोन वेळा पात्र ठरलेल्या या नेमबाजला प्रशिक्षक किंवा मित्र-मैत्रीणींकडून रायफल मागावी लागायची. तिच्या ट्विटला सोनू सूदनं मार्चमध्ये उत्तर दिले आणि लवकरच तिला रायफल मिळेल, असे आश्वासन दिले.
"रायफलची किंमत ३ लाख रुपये असून ति मी विकत घेऊ शकत नाही.यासाठी मला प्रशिक्षक आणि मित्र-मैत्रीणींवर अवलंबून रहावे लागते. नविन रायफन घेण्याची ईच्छा आहे त्यासाठी मी ८० हजार जमा केले आणि १ लाखाचे कर्जही काढले पण आजुनही रक्कम कमी पडत आहे. आपन मदत केली तर मी नविन रायफल घेऊ शकेल.जर्मन बनावटीची ही रायफल दोन-अडीच महिन्यात माझ्याकडे येईल,"असे कोनिकानं मार्च महिन्यात The Telegraph ला सांगितले होते.
दिनांक २७ जुनला रविवारी कोनिकाला पाहीजे असलेली रायफल तिझ्या घरी आली. आनंदात असलेल्या कोनिकाने रायफल सोबतचे फोटो पोस्ट करून सोनू सूदचे आभार मानले. 'सर माझी बंदूक आली. माझ्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे आणि संपूर्ण गाव तुम्हाला आशीर्वाद देत आहे,"असे तिनं लिहिले.
सोनू सूदने सुद्धा ट्विटला उत्तर दिले आणि सांगीतले ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे सुवर्णपदक निश्चित. आता फक्त प्रार्थनेची गरज आहे. असे बोलत कोनिकाच्या मनात सोनू सूदने एकप्रकारे उर्जा निर्माण केली.