हृतिकने गर्लफ्रेंड सबाला दिल्या वाढदिवसाच्या दिवशी अनोख्या शुभेच्छा: नेटकरी म्हणाले- ही तुझी मुलगी आहे का?
काल (1 नोव्हेंबर) बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आजाद हिचा वाढदिवस होता. या खास प्रसंगी हृतिकने एक सुंदर फोटो शेअर करत तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबत त्याने प्रेमळ कॅप्शन लिहून आयुष्यात आल्याबद्दल आभार मानले आहेत.
हृतिकने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'तुझा ताल, तुझा आवाज, तुझी शैली, तुझे हृदय आणि हो तुझे ते आश्चर्यकारक मन, तुझ्या सुरांमध्ये मग्न... तेच तू आहेस. एक छान व्यक्ती असल्याबद्दल धन्यवाद. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.'
ही पोस्ट समोर येताच चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी कमेंट करून सबाला शुभेच्छा दिल्या आहेत. जिथे हृतिकची बहीण पश्मिना रोशन आणि माजी पत्नी सुजैन खानने सबाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या. त्याच वेळी, एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटले की, ही हृतिकची मुलगी आहे का? काही वापरकर्त्यांनी हृतिक-सबाला त्यांच्या वयातील फरकामुळे ट्रोल करण्यास सुरुवात केली.