हॉलिवूड विश्व हादरलं! अभिनेते टायलर ख्रिस्तोफर यांचं वयाच्या 50 व्या वर्षी निधन
मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. जनरल हॉस्पिटल आणि डेज ऑफ अवर लाइव्ह या फेमस शोसाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता टायलर ख्रिस्तोफर याचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने टायलरचा मृत्यू झाला आहे. 'जनरल हॉस्पिटल' आणि 'डेज ऑफ अवर लाईव्स'मधील त्यांच्या भूमिका चांगल्याच गाजल्या आहेत. 'जगरल हॉस्पिटल'मधील त्यांचे सहकलाकार मॉरिस बेनार्ड यांनी त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे.
मौरिसने पुढे लिहिलं आहे,"टायलर हे एक प्रभावशाली व्यक्ती आहेत. आपल्या अभिनयाने टायलर यांनी रुपेरी पडदा गाजवला आहे. टायलरला ओळखणाऱ्यांना माहिती आहे की, ते एख चांगले व्यक्ती होते. गेल्या काही दिवसांपासून टायलर नैराश्याचा सामना करत होते. जवळचा मित्र गमावल्याने खूप वाईट वाटत आहे.
आपल्या मित्राच्या निधनाच्या बातमीने बेनार्ड खुप दु:खी आहे तो लिहितो, 'टायलर हा खऱ्या अर्थाने एक प्रतिभावान व्यक्ती होता ज्याने प्रत्येक सीनमध्ये प्रकाश टाकला आणि आपल्या अभिनयाने लाखो लोकांची मने जिंकली. टायलर एक चांगला माणुस होता, त्याला ओळखणाऱ्या प्रत्येकासाठी तो एक चांगला मित्र होता.'
टायलर ख्रिस्तोफर यांनी 1969 ते 2016 पर्यंत 'जनरल हॉस्पिटल'मध्ये निकोलस कैसडाइनच्या माध्यमातून प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. तसेच 'डेज ऑफ अवर लाईव्स फ्रॉम'मध्ये त्यांनी साकारलेली डिमेरा ही भूमिकाही चांगलीच गाजली. या भूमिकेने त्यांनी प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं.