'ब्रह्मास्त्र' चित्रपटासाठी निर्मात्यांनी लावले चक्क एवढे पैसे....
रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhat) स्टारर 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. हा चित्रपट रिलीज होण्यास आता अवघे काही दिवसच उरलेले आहेत. हा चित्रपट या वर्षातील सर्वात बिग बजेट मानला जात आहे. चित्रपटाचे बजेटही कमी नसल्याचं सांगितलं जात आहे. चित्रपटाच्या बजेटबाबत एक मोठी माहिती समोर येत आहे. ९ सप्टेंबरला प्रदर्शित होणारा 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट असल्याचे बोलले जात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार या चित्रपटाच्या निर्मितीसाठी निर्मात्यांनी 410 कोटी रुपये खर्च केले आहेत. या बजेटमध्ये चित्रपटाचे प्रमोशन आणि चित्रपटगृहात आणण्याचा खर्च समाविष्ट नाही. या चित्रपटावर एवढा खर्च करणाऱ्या निर्मात्यांना विश्वास आहे की या चित्रपटातून प्रेक्षकांना पडद्यावर असा अनुभव मिळेल जो त्यांनी याआधी कधीही पाहिला नसेल.
चित्रपटाच्या टीमचा ब्रह्मास्त्रावर पूर्ण विश्वास.
रिपोर्ट्समध्ये असे सांगितले जात आहे की डिस्ने आणि धर्मा प्रोडक्शनच्या संपूर्ण टीमला विश्वास आहे की ब्रह्मास्त्र केवळ लोकांच्या हृदयातच नाही तर बॉक्स ऑफिसवरही जादू निर्माण दाखवण्यात सक्षम ठरेल. अधिक माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगु इच्छितो की चित्रपटात रणबीर कपूर शिवा नावाच्या तरुणाच्या भूमिकेत आहे. ज्याच्याकडे जादुई शक्ती आहे. या चित्रपटात आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागार्जुन महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
चित्रपटाचे बजेट कसे वाढले?
हा चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता. परंतु कोरोना महामारीमुळे त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. आणि चित्रपटाचे बजेट वाढतच गेले. अशा परिस्थितीत चित्रपटाच्या स्टारकास्टची फी देखील कमी नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार रणबीर कपूरने मुख्य भूमिकेसाठी 25-30 कोटी रुपये घेतल्याचं कळतय. त्याचबरोबर आलियाने 10-11 कोटी रुपये चित्रपटाची फिस घेतल्याचं सांगण्यात येत आहे.