चहा ऑर्डर केला अन्...; हेमांगीने सांगितला ताजमधील 'तो' अनुभव
रोखठोक वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी होय. कोणताही विषय असो हेमांगी नेहमीच खुलेपणाने बोलताना दिसते. सोशल मीडियावर ती कायमच सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. आता हेमांगीने एक वेगळाच अनुभव तिच्या चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.
पहिल्यांदाच ताज हॉटेलमध्ये गेल्यावर कसं वाटलं? हे हेमांगीने एका पोस्टच्या माध्यमातून सांगितलं आहे. 41 वर्ष मुंबईत राहूनही कधी ताज हॉटेलमध्ये जायची हिंमत नाही झाली. कारण इच्छा असली तरी आपण पडलो मध्यम वर्गीय आणि मध्यम वर्गीय माणसाला हिंमत गोळा करायला बराच काळ जावा लागतो. मी आजही मध्यम वर्गीयच आहे. परिस्थिती आता सुधारलीये बरं म्हणायला पुरेशी असली तरी मध्यम वर्गीय 'मानसिकता' गळून पडेल याची गरंटी देत नाहीत, असे हेमांगीने म्हंटले आहे.
आत तर 250/300 रुपयांचा फक्त चहा? बाप रे नको! मग ताजकडे पाठ करत, समुद्राकडे बघत, हातात अडीच रुपयांच्या कटींगच्या चहावर फुंकर मारत आधीच थंड असलेल्या परिस्थितीला अजून गार करत घोट घ्यायचे, असेही तिने सांगितले.
अभिनय क्षेत्रामुळे अनेक ठिकाणी भटकंती झालीये. भारतात, भारताबाहेर, मोठ्या हॉटेलमध्ये राहायलेय. तिथलं खाल्ले-पिले. इतक्या वर्षात मोठ्या जागेची, झगमगाटाची, जगण्याची नाही किमान पाहण्याची तरी सवय आता झालीये. पण ताज हॉटेल मध्ये जायची हिंमत अजूनही आला नाही, असेही हंमांगीने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहीले आहे.