Ekta Kapoor
Ekta KapoorTeam Lokshahi

Happy Birthday Ekta Kapoor : असा आहे एकता कपूरचा इंडस्ट्रीतील प्रवास

टेलिव्हिजन क्वीन म्हणून ओळखली जाणारी एकता कपूर आज ४७ वर्षांची झाली आहे.
Published by :
shweta walge
Published on

टेलिव्हिजन क्वीन (Television Queen) म्हणून ओळखली जाणारी एकता कपूर (Ekta Kapoor) आज ४७ वर्षांची झाली आहे. एकता आज इंडस्ट्रीतील (industry) सर्वात यशस्वी महिला आहे,पण तिचा सुरुवातीचा प्रवास अडचणींनी भरलेला होता. हम पांच, क्यूंकी सास भी कभी बहू थी, कसौटी जिंदगी की यांसारखे सर्वोत्कृष्ट डेली सोप तयार करून एकता गेली अनेक वर्षे लोकांची मने जिंकत आहे. आज, सुमारे 39 चित्रपट, 45 मालिका आणि 135 डेली सोपची निर्मिती करणाऱ्या एकताने आपल्या करिअरची सुरुवात एका नोकरीपासून केली. वडील स्टार होते, पण एकताने वडिलांची स्टार पॉवर न वापरता तिची कारकीर्द खूप उंचीवर नेली आहे.

स्टार किड (Star Kid) असल्याने एकता तिचे जवळपास सर्व छंद पूर्ण करत होती, पण एक वेळ अशी आली जेव्हा तिच्या वडिलांनी तिला पॉकेटमनी (Pocket money) देण्यास नकार दिला. कारण फक्त 17 वर्षांच्या एकताला खूप पार्टी करण्याची सवय होती. वडिलांनी तीला स्पष्ट सांगितले - एकतर तू लग्न कर, नाहीतर मला हवं तसं काम कर, पार्टी नाही.

एकताला तीच्या वडीलांच्या बोलण्याचा इतका मोठा परिणाम झाला की तिने अ‍ॅड फिल्ममेकर कैलाश सुरेंद्रनाथ (Kailash Surendranath) यांच्यासोबत इंटर्नशिप (Internship) सुरू केली. इंटर्नशिप पूर्ण झाल्यावर एकता त्याच जाहिरात कंपनीत काम करू लागली. एकताची आवड पाहून तिच्या वडिलांनी तिला काम सुरू करण्यासाठी आर्थिक मदत केली. पैसे मिळाल्यानंतर एकताने निर्माता म्हणून बालाजी टेलिफिल्म्समध्ये (Balaji Telefilms) काम करायला सुरुवात केली. 1995 वर्षी एकताने हम पांच शो बनवला जो तिचा पहिला हिट शो होता.

Ekta Kapoor
Karan Johar : करण जोहरच्या बर्थडे पार्टीत कोरोनाचा धमाका ? ५५ पाहुणे कोविड पॉझिटिव्ह

एकताचा ज्योतिषावर (astrology) विश्वास आहे त्यामुळे 27 वर्षांच्या कारकिर्दीत, एकताने असे 63 शो तयार केले आहेत ज्यांचे शीर्षक 'K' ने सुरू होते. त्यातल्या त्यात क्योंकि सास भी कभी बहू थी, कसौटी जिंदगी काय, कभी घर घर की, कभी सौतन कभी सहेली, कोई अपना सा, कहीं रोज, कुटुंब, कुसुम, कितनी मोहब्बत है, काव्यांजली, कयामत सर्वात लोकप्रिय होते.

आजपर्यंत, एकताने कृष्णा कॉटेज, लव्ह सेक्स और धोका, वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई, द डर्टी पिक्चर, रागिनी एमएमएस, हाफ गर्लफ्रेंड, एक व्हिलन, ड्रीम गर्ल यांसारख्या सुमारे 39 चित्रपटांची निर्मिती केली आहे.

एकता कपूरला लहानपणापासून लग्न करण्याची खूप क्रेझ होती, पण इंडस्ट्रीत आल्यानंतर तिचा लग्नावरील विश्वास उडाला. पण तिला आई व्हायचं होतं. एकताने वयाच्या 44 व्या वर्षी सरोगसीद्वारे मुलगा झाला ज्याचे नाव तिने रवी कपूर (Ravi Kapoor) ठेवले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com