गुलशन कुमार : म्युझिक कंपनीतून सुरुवात करुन संगीत विश्वास सर्वोच्च स्थानी
T-Series चे संस्थापक गुलशन कुमार (Gulshan Kumar) यांची आज म्हणजेच 5 मे रोजी Birth Anniversary आहे. एका छोट्या म्युझिक कॅसेट कंपनीतून बिझनेस सुरू करणाऱे गुलशन कुमार संगीत विश्वातील प्रसिद्ध नाव आहेत.
गुलशन कुमारचा जन्म 5 मे 1956 रोजी पंजाबी कुटुंबात दिल्ली येथे झाला. गुलशन यांनी दिल्लीतील देशबंधू कॉलेजमधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. दिल्लीतील दर्यागंज भागात त्याच्या वडीलांचे ज्यूसचे दुकान होते, तिथे गुलशन त्याच्यासोबत काम करत असे. नंतर त्यांच्या वडिलांनी दुसरे दुकान घेतले ज्यात स्वस्त कॅसेट आणि गाणी रेकॉर्ड करून विकली जात. येथूनच गुलशन कुमार यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली.
गुलशन यांनी सुपर कॅसेट इंडस्ट्रीज (Super Cassette Industries) लिमिटेड कंपनी स्थापन केली जी भारतातील सर्वात मोठी संगीत कंपनी बनली आणि त्यानां कॅसेट किंग (Cassette King) म्हणून ओळखले जाऊ लागले. हळुहळू त्यांचे भक्तिगीते आणि भजने लोकप्रिय झाले. मुंबईत आल्यानंतर त्यांनी 15 हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली. 1989 मध्ये 'लाल दुपट्टा मलमल का' हा त्यांचा पहिला निर्मित चित्रपट होता. पण त्यांना खरी ओळख मिळाली ती 1990 मध्ये आलेल्या 'आशिकी' चित्रपटातून. गुलशन कुमार यांनी सोनू निगम (Sonu Nigam), अनुराधा पौडवाल, कुमार सानू यांसारख्या अनेक गायकांना लॉन्च केले. 1992 मध्ये गुलशन कुमार भारतातील सर्वाधिक कर भरणारे व्यक्ती ठरले.
अंडरवर्ल्ड पैसे मागत होते
एकदा अबू सालेमने गुलशन (Abu Salemne Gulshan) कुमारला दरमहा 5 लाख रुपये देण्यास सांगितले तेव्हा गुलशन कुमारने नकार दिला आणि सांगितले की ते इतके पैसे देऊन वैष्णोदेवीमध्ये भंडारा आयोजित करू. तेव्हापासून तो अंडरवर्ल्डच्या (underworld) निशाण्यावर आला होता.
गुलशन कुमार एका मंदिरात रोज आरती करत असे. 12 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक 10:40 वाजता त्यांनी मंदिरातील पूजा उरकून त्यांच्या गाडीच्या दिशेने निघाले तेवढ्यात एक लांब केस असलेला अज्ञात व्यक्ती त्यांच्या जवळ येऊन उभा राहिला आणि तो ओरडला आणि म्हणाला - खूप पूजा केली आता वर जा आणि पूजा कर. यानंतर तिथेच उपस्थित असलेले अन्य दोन अज्ञात व्यक्तीने गुलशन कुमारवर सुमारे 16 गोळ्या झाडल्या. त्याच्या ड्रायव्हरने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला पण शूटर्सनी त्याच्यावरही गोळी झाडली. गुलशन कुमार यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.