Gharat Ganpati: 'घराला घरपण देणारी लंबोदर कथा...' जाणून घ्या कसा आहे 'घरत गणपती' चित्रपट
गणेशोत्सव म्हटला की तो प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. गणेशोत्सवाला कोकणात मोठा सण म्हणून मानला जातो, कारण मुंबईमध्ये कामासाठी राहणारा प्रत्येक कोकणी माणूस हा गणपती सणादरम्यान आपल्या राहत्या कुटुंबासह कोकणात आपल्या घरी जातो. यादरम्यान घरातील प्रत्येकासोबत सणाचे ते पाच दिवस अगदी सगळे आनंदाने हसत खेळत राहतो. यावेळेस कुटुंबातील प्रत्येक जण आपले परस्परांतील वाद रुसवे विसरून एकत्र येऊन गणेशोत्सव सण साजरा करतात.
कुटुंब हा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि याच विषयावर नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांनी एका कुटुंबाची कथा 'घरत गणपती' या मराठी चित्रपटाद्वारे मांडली आहे. 'घरत गणपती' हा चित्रपट 26 जुलै 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. 'प्रत्येक घरातली आणि घरातील प्रत्येकाची' ही गोष्ट असून नातेसंबंधांची सुरेख साखळी या चित्रपटातून दाखवली आहे. या चित्रपटात तीन पिढ्याची गमतीशीर कहाणी या चित्रपटात मांडली आहे.
या चित्रपटात अनेक वाद आणि मतभेद दाखवले गेले आहेत पण तरी गणरायाच्या आगमनासाठी प्रत्येक कुटुंब एकत्र येतो. तर यामधील प्रमुख भुमिका साकराणारा भूषण प्रधान हा कुटुंबाचे वाद मिटवण्याचा प्रयत्न करत कुटुबाला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करताना दाखवला आहे. तसेच या चित्रपटात भूषण प्रधान, अश्विनी भावे, अजिंक्य देव, संजय मोने, निकिता दत्ता, शुभांगी लाटकर, शुभांगी गोखले, परी तेलंग,आशिष पाथोडे, रूपेश बने, राजसी भावे, समीर खांडेकर हे कलाकार एका नवीन भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.