‘गदर 2’ पुन्हा दिसणार अमिषा पटेल-सनी देओलची जोडी

‘गदर 2’ पुन्हा दिसणार अमिषा पटेल-सनी देओलची जोडी

Published on

बॉलिवूडची एक सुपरहिट जोडी पुन्हा एकदा परत आली आहे. सनी देओल आणि अमीषा पटेल पुन्हा एकदा अनिल शर्माच्या चित्रपटात दिसणार आहेत. 'गदर – एक प्रेम कथा' आता पुढे जाणार आहे आणि पुन्हा एकदा आपण तारा आणि सकीनाच्या प्रेमाचे साक्षीदार होणार आहोत . या चित्रपटाची घोषणा आज 15 ऑक्टोबर ला करण्यात आली . तसेच चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा, अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमीषा पटेल यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे.

बॉलिवूड अभिनेता सनी देओल , अभिनेत्री अमीषा पटेल आणि अमरीश पुरी अभिनीत सुपरहिट फिल्म 'गदर : एक प्रेम कथा' आजपर्यंत प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे. तरच, प्रत्येकजण या चित्रपटाचा भाग 2 तयार होण्याची वाट पाहत होते. आणि प्रेक्षकांची प्रतीक्षा आता संपली. पुन्हा सनी आणि अमीषाची जबरदस्त केमिस्ट्री प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे.

'गदर' चित्रपटाचे नाव उच्चारले की, तो हँडपंप उखडण्याचा सीन प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येतोच. हा सीन पाहून प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला होता. असेच काहीतरी पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी आता याचा खुलासा केला होता. त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, 'गदर' चे निर्माते यावेळी तयार होणारा सिक्वेल लक्षात घेऊन प्लॉट आणि स्क्रिप्टवर काम करत होते.

जेव्हा चित्रपटाचा सिक्वेल बनतो, तेव्हाबऱ्याचदा लीडची जोडी बदलते. पण 'गदर'च्या पार्ट 2मध्ये सनी देओल आणि अमीषा पटेलच लीड रोलमध्ये दीसणार असून या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

अनिल शर्मा यांचा मुलगा उत्कर्षही यात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. असं म्हणतात की, चित्रपटाच्या पहिल्या भागात उत्कर्षने सनी आणि अमीषाचा मुलगा जीता याची भूमिका साकारली होती. अभिनेता म्हणून त्याने वर्ष 2018मध्ये 'जीनियस' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

'गदर 2' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'गदर -एक प्रेम कथा' या चित्रपटा प्रमाणेच 'गदर 2' ला देखील प्रेक्षक चांगला प्रतिसाद देतील अशी अपेक्षा आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com