तीन गाण्यांसाठी तीन लाख? इंदुरीकर महाराजांच्या आरोपावर गौतमी पाटीलने स्पष्टच सांगितले

तीन गाण्यांसाठी तीन लाख? इंदुरीकर महाराजांच्या आरोपावर गौतमी पाटीलने स्पष्टच सांगितले

इंदुरीकर महाराजांनीच गौतमी पाटीलवर निशाणा साधला होता. याला गौतमी पाटीलने उत्तर दिले.
Published on

अभिराज उबाळे | पंढरपूर : गौतमी पाटीलला ओळखत नाही असा माणूस महाराष्ट्रात तरी सापडणं कठीण आहे. कारण लहानांपासून तर साठीला टेकलेल्या म्हाताऱ्यानं सुद्धा गौतमीचा डान्स पाहिलाय. अशात, थेट प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराजांनीच गौतमी पाटीलवर निशाणा साधला होता. तीन गाणे वाजवून तिला तीन लाख मिळतात, असे त्यांनी म्हंटले होते. याबाबत गौतमीला विचारले असता तिने उत्तर देणे टाळले, मीही त्यांची फॅन आहे. ते म्हणतात इतकं माझे मानधन नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

तीन गाण्यांसाठी तीन लाख? इंदुरीकर महाराजांच्या आरोपावर गौतमी पाटीलने स्पष्टच सांगितले
Gautami Patil Favorite Cricketer : तुम्हाला माहिती आहे का? गौतमीला कोणता खेळाडू आवडतो? पहा ती काय म्हणाली...

इंदूरीकर महाराज जे बोलतात तीन लाख रुपये खूपच म्हणतात तेही तीन गाण्यांना. एवढं मानधन मी घेत नाही. मी त्यांची बाईट अजून पहिली नाही. मी पण त्यांची फॅन आहे. महाराजांवरही प्रेक्षक तेवढंच प्रेम करतात. असे म्हणत त्यांच्याबद्दल गौतमी पाटीलने आदर व्यक्त केला.

माझ्या पूर्वी ज्यांनी टीका केली त्यांना मी दोष देतं नाही. कारण त्यावेळी जरा चुका झाल्या होत्या. आता मात्र आम्ही सर्व त्रुटी भरून काढतोय. मात्र अजूनही काही लोकं त्याचं नजरेने बघतात. त्यांनी देखील आता बदलावे, असे आवाहन देखील तिने केले आहे. तर, आगामी घुंगरू चित्रपटात नृत्यांगनेच्या जीवनावर आधारित भूमिका केली आहे. पुढील काळात नक्कीच समाज सुधारणा बद्दल कामं करण्याची इच्छा गौतमी पाटील यांनी व्यक्त केली.

दरम्यान, इंदुरीकर महाराजांनी आपल्या शैलीत गौतमी पाटीलचा खरपूस समाचार घेतला होता. तीन गाणे वाजवून तिला तीन लाख आणि आम्ही पाच हजार मागितले तर पैशाचा बाजार मांडला म्हणून आमच्यावर आरोप होतो. गाण्यांच्या कार्यक्रमात हाणामारी होते, काहींचे गुडघे फुटतात. आम्हाला मात्र टाळ वाजवून काहीही मिळत नाही. साधं संरक्षण देखील दिलं जात नाही, असं म्हणत इंदुरीकरांनी गौतमीवर टीका केली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com