मराठा आरक्षणावर गौतमी पाटीलची प्रतिक्रिया; म्हणाली, मला देखील आरक्षण...

मराठा आरक्षणावर गौतमी पाटीलची प्रतिक्रिया; म्हणाली, मला देखील आरक्षण...

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर सभांचा धडाका लावला आहे. अशातच, लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील हिने प्रतिक्रिया दिली आहे.
Published on

पुणे : मराठा आरक्षणासाठी राज्याच राजकारण तापले आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर सभांचा धडाका लावला आहे. अशातच, लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील हिने प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेलच पाहिजे, अशी भूमिका तिने मांडली आहे. तर, मला देखील आरक्षण हवंय, असेही गौतमीने म्हंटले आहे.

गौतमी पाटील म्हणाली की, मराठा समाजाला आरक्षण मिळेलच पाहिजे. आज अनेकांना आरक्षण हवंय तर ते मिळेलच पाहिजे. मला देखील आरक्षण हवंय. मला देखील कुणबी प्रमाणपत्र हवंय, असे तिने म्हंटले आहे. कोरोना काळात माझीही परिस्थिती खूप हालाखीची होती. हे क्षेत्र चालायला हवं, असेही तिने सांगितले आहे.

तर, गौतमी पाटीलची सहकारी हिंदवी पाटीलने वेगळा ग्रुप निर्माण केला आहे. यावर भाष्य करताना गौतमी पाटील म्हणाली, मी अकरा वर्षापासून या क्षेत्रात काम करते अनेक मुली माझ्या हाताखालून गेल्या आहेत. हिंदवी पाटीलच चांगलं होवो. आमच्यातून कोण फुटून गेलं तर आम्ही त्याला गद्दार अजिबात नाही म्हणत. उलट त्यांचं चांगलं होऊ दे, असे तिने म्हंटले आहे.

दरम्यान, मी अजिबात राजकारणात जाणार नाही. नवा चित्रपट मिळाला तर करेन. चित्रपट मिळाला तरी डान्स करणे सोडणार नाही. तसेच, सध्या माझ्या डोक्यात लग्नाचा अजिबात विचार नाही, असेही गौतमी पाटीलने माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com